लातूर : एकेकाळी आदर्श जिल्हा परिषद म्हणून नावलोकीक मिळवलेल्या लातूरच्या जिल्हा परिषदेत आज भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजली आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात चक्क ई-टेंडरच मॅनेज होत असल्याची जोरदार चर्चा असुन त्यास कोणाचे पाठबळ आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गप्प का?, मुख्य कार्यकारी अधिकारी कठोर भूमिका घेणार का?, अशा अनेक प्रश्नांनी जिल्हा परिषदेचे परिसर दणाणुन गेले आहे.
जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. बांधकाम समिती सभापतींच्या ‘पती’ राजांना कोणाचे पाठबळ?, असा प्रश्न दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेच्या सदस्यांनाही पडला आहे. बांधकाम विभागात ई-टेंडरची कामे मॅनेजमेंट सिस्टीमने चालतात. लाखो रुपयांची कामे सभापतीचे नातलग करीत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच बांधकाम विभागात विशिष्ट लोकांची मक्तेदारी सुरु आहे काय?, अशी चर्चा आहे. हे सर्व कोणाच्या वरदहस्ताने सुरु आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष का? या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनीच सभापतींच्या ‘पती’ राजचा विषय ऐरणीवर आणला होता.
या विषयाने संपूर्ण सभागृह दणाणुन सोडले होते. बांधमाक सभापती केवळ नावालच असून त्यांचे पतीच सभापतीचे सर्व अधिकार वापरतात. मनमानी करतात. मक्तेदारी असल्यासारखे वागतात. आर्थिक विषयात हस्तेक्षेप करुन त्याचा लाभ आपल्या नातलगांना कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न सुरु असतात, असा आरोप सदस्यांनी केला होता. या सर्व प्रकरणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी जाणिवपुर्वक दुर्लक्ष का केले?, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल या गंभीर प्रकरणावर काय भुमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागुन आहे.
बीओक्यू कोडच ओपन होत नाही
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कामांचे ई-टेंडर निघते खरे परंतु, ई-टेेंडर भरणा-यांना बीओक्यू कोडच ओपन होत नाही, अशा तक्रारी आहेत. हे सर्व कोण करतोय, कोणाच्या वरदहस्ताने होते?, या प्रश्नाची उत्तरे अद्यापतरी अनुत्तरीत आहेत.
भारतीय पेहराव नसल्यास शिर्डीत ‘नो एन्ट्री’