30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरनीटमध्ये अजय राठोड याचे उज्वल यश; वैद्यकिय शिक्षणासाठी पात्र

नीटमध्ये अजय राठोड याचे उज्वल यश; वैद्यकिय शिक्षणासाठी पात्र

एकमत ऑनलाईन

लातूर : – नीट परीक्षेत लातूरच्या दयानंद महाविद्यालयाचा हा अजय भीमराव राठोड याने नीट मध्ये ५५६ गुण घेवून घवघवीत यश संपादन केले आहे. वडीलांच्या अकाली निधनानंतर अजयने वडीलांचा विश्वास सार्थ ठरवत अत्यंत प्रतिकुल परिस्थिती हे यश संपादन करून वैद्यकिय शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. बालाघाटच्या डोंगररांगामध्ये बोथी तांडा या छोट्यााश गावाातील बंजारा समाजातील अजय भीमराव राठोड याने मिळविलेेले यश इतर युवकांना प्रेरणादायी ठरणारे असून या यशाबद्दल त्यााच्या सर्व स्तरांतून कौतुुकाचा वर्षाव होत आहे.

चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथील बंजारा समाजातील अल्पभूधारक कुटूंबामध्ये जन्मलेल्या अजयला लहानपणापासूनच शिक्षणाचा आवड होती.मी डॉक्टर होणार ही खुणगाठ बांधलेल्या अजयने कोणत्याही भौतिक सुविधांची अपेक्षा न बाळगता अभ्यासात सातत्य ठेवले. शिक्षणाच्या काळात वडिलांचे छत्र हरपले, पण त्याने शिक्षण सोडले नाही.शिक्षणाचा आलेख त्याने सतत चढता ठेवला.परिस्थिती बिकट असताना ही त्याचा मोठा भाऊ अविनाश याने पुणे येथे मजुरी व ऊसतोडणी करून शिक्षणाचा खर्च भागविला.वडिलांची डॉक्टर होण्याची इच्छा व भावाने दिलेली अनमोल मदतीने त्याने इप्सित ध्येय साध्य केले.

घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य त्यात शिक्षणाचा अफाट खर्च अशा बिकट परिस्तिथीमुळे कोणतेही शिकवणी लावली नाही. त्यात नीट परिक्षेच्या काळात टायफाईड/निमोनिया आजाराशी संघर्ष करत त्याने नीटमध्ये ७२० पैकी ५५६ गुण घेऊन प्रतिकूल परिस्थितीत ही यश संपादन करता येते हे दाखवून दिले. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे ही वडीलांची इच्छा, अभ्यासात सातत्य व भावाने कष्ट करून टाकलेला विश्वासामुळे मी इथपर्यंत पोहचू शकलो अशी भावना अजय ने व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परंडा तालुक्यातील आतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या