27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरआजोळी आलेल्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

आजोळी आलेल्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : तालुक्यातील टाकळगाव ( का ) येथे दोन सख्ख्या भावांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ( दि. १९ रोजी) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील रोहन राम वडमारे (१८ वर्ष ) व रोहित राम वडमारे (१६ वर्ष) असे मृतांची नावे आहेत. तालुक्­यातील सर्वच धरणात पाणी साठा भरपूर झाला आहे. रोहन वडमारे व रोहित वडमारे हे दोघे औरंगाबाद येथील रामनगरात राहतात. हे दोन सख्खे भाऊ सुट्टया असल्यामुळे आजोळी टाकळगाव येथे भेटायला आले होते. सुट्टीचे दिवस असल्याने हे दोघे आपल्या आजोळी टाकळगाव (का.) येथे आले होते. सोमवारी हे दोघे दुपारी दोनच्या सुमारास आजोबा सोबत जनावरे घेऊन शेताकडे गेले. शेताच्या बाजूला असलेल्या पाझर तलाव क्र. ५ मध्ये उतरले परंतु पुढे जाताना तलावातील खोलीचा अंदाज नसल्याने ते खोलवर बुडाले.दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला.

जढाळा येथील कोळी, भोई बांधवाची मृतदेह शोधण्यात मदत
रोहन वडमारे व रोहित वडमारे या दोघांनी तलावाजवळ ठेवलेल्या कपड्यांनी तलावातील पाण्यात बुडाल्याचा अंदाज आला सोमवारी दुपारी तीन वाजता रोहनचा तर मंगळवारी दुपारी एक वाजता रोहितचा मृत देह सापडला. या शोध मोहिमेत अग्निशामन दलाचे माधव पानपट्टे, प्रकाश जाधव, अजित लाळे, कैलास सोनकांबळे यांच्यासह जढाळा येथील कोळी व भोई युवकांनी सहकार्य केले.

माजी मंत्री जाधव यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी टाकळगाव (का) येथे जाऊन मयताचे आजोबा संतराम कांबळे व मामा विक्रम कांबळे यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक के.एन. चव्हाण, तलाठी जाधव याची घटनास्थळी उपस्थिती होती.

दैनंदिन आहारात आयोडीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या