25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरशासकीय, खाजगी रुणालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत

शासकीय, खाजगी रुणालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मागच्या आठ दिवसांत लातूर शहर तसेच जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कोवीड-१९ बांधीत रुग्णावरील उपचार आणी प्रादूर्भाव नियंत्रणसाठी शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपयायोजनांचा आढावा घेतला. त्यांनतर दि. १९ एप्रिल रोजी सकाळी लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिका-यांची आयोजित आढावा बैठकीत सोबत या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली. शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील सर्व बेड ऑक्सिजेनेटेड करावेत, असे आदेश दिले आहेत.

संकट गंभिर असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याने नमूद करुन या प्रार्दूभावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असणा-या सुविधा उभारण्यापासून आगामी काळात किमान १५ दिवस मनुष्यबळ, ऑक्सिजन, औषधे या कोणत्याच गोष्टीचा तुटवडा भासणार नाही यांचे आताच नियोजन करुन ठेवावे, असे निर्देश बैठकी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या आढावा बैठकीत पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी, जनतेमधील घबराहट टाळण्यासाठी मृत्यु संख्येचे विश्लेषन करावे, औद्योगिक क्षेत्रात टेस्टींग आणि व्हॅकसीनेशन व्यवस्था उभा कराव्यात, बैठकीनंतर चार दिवसात अ‍ॅक्शन टेकन अहवाल सादर करावा, बेड कोठे उपलब्ध आहे ते पाहून रुग्णांना तेथे पाठविण्याची व्यवस्था महापालीकेने करावी, शहरातील स्मशानभुमीत गॅसदाहीनीची व्यवस्था उभा करावी, भाजी मार्केट तातडीने स्थलांतर करावे, संस्थात्मक लसीकरणातुन या मोहिमेला गती द्यावी, असे आदी निर्देश यावेळी संबंधित अधिकारी यांना दिले आहेत.

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यास अन्य तालुक्यात जेथे बेड असेल तेथे रुग्णांना उपचारासाठी पाठवावे, उदगीरमध्ये किमान ३० व्हेंटिलेटर बेड असावेत, यासोबतच हॉस्पिटल दर्जा असलेल्या तालुक्यातील रुग्णालयात किमान १५ टक्के व्हेंटिलेटर बेड असावेत, वैद्यकीय सेवा देण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्यास कंत्राटी तत्वावर अथवा सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सेवेत सामावून घ्यावेत, विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्थेत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी तात्काळ कामाला लागावे, लसीकरण करताना लसीकरण केलेल्या प्रत्येकाची नोंद आरोग्य विभागाकडे असावी, शहरातल्या खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर असे ७०० बेड तात्काळ वाढवून घ्यावेत असे निर्देश मनपा आयुक्तांना दिले.

खाजगी रुग्णालयातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करीता किमान ५० ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड असावेत यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवावा, जिल्ह्यातील कोविड १९ रुग्णांचा वाढता मृत्युदर कमी करण्यासाठी मोनेटंिरग युनिट सुरू करून अधिक लक्ष केंद्रित करावे व मृत्युदर वर्गीकरण आणि कारणे याचे विश्लेषण जनतेपर्यंत जावे जेणेकरून नागरिकाना ही माहिती मिळेल, बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट नियमावली नुसार शहरातील खाजगी रुग्णालयात उपलब्ध आरोग्य सेवा सुविधाचा एक विशेष ड्राइव्ह राबवावा, फ्रंट लाईन वर्कर साठी कोविड-१९ उपचारा करीता स्वतंत्र विंग तयार करावी, लातूर भाजीपाला मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी होलसेल व रिटेल भाजीपाला विक्रेते यांच्या सोयीचा व गर्दी टळेल असा पर्यायी मार्ग लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व मनपाने एकत्रित बसून चर्चेतून काढावा, जिल्ह्यातील तालुकास्तरीय आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर साठी लागणारया किमान १५ दिवसाची आवश्यक बाबीची मागणी यादी जिल्हाधिका-यांना प्रत्येक तालुक्यातील अधिका-यांनी सादर करावी, महात्मा फुले आरोग्य योजनेच्या विम्याचा कालावधीत बदल करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, एम. आय. डी. सी.मधील चालणा-या सर्व उद्योग कारखाने यातील कामगारांची कोविड-१९ चाचणी प्राधान्याने करुन घ्यावी, लसीकरण करीता येणा-य नागरिकांची देखील रॅपिड टेस्ट करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यातील कोविड-१९ चा आढावा सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लॉकडाऊन काळात ६० ते ६५ टक्के पोलीस फोर्स तैनात केला असून येणा-या काळात एन. सी. सी.कॅडेटला या काळात सामावून घेण्यात येणार असल्याचे सांगीतले. लातूर शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिली. बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनीही बाजार समितीच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. बैठकीस अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय ढगे, डॉ. हरीदास यासह इतर वरीष्ठ अधिकारी होते.

खाजगी रुग्णालयांना हॉटेलशी सलग्न करण्याचा पर्याय अवलंबावा
अधिकचे बेड उपलब्ध होण्यासाठी खाजगी रुग्णालयांना हॉटेलशी सलग्न करण्याचा पर्याय अवलंबावा, शासकीय आणि खाजगी रूग्णालयातील सर्व बेड ऑक्सिजनेटेड करावेत, बाधीत फ्रंट लाईन वर्कर्सच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, सुपरस्पेशालीटीमध्ये २५ टक्के इतर शासकीय आणि खाजगी रूग्णालयात १५ टक्के बेडला वेंिन्टलेटर अनिवार्य करावेत, जेथे ऑक्सिजन बेड असेल तेथे तशा रूग्णांना शिफट करण्याची व्यवस्था उभारावी, कोवीड केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढवावी, मृत्युदर कमी राखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युध्द पातळीवर उभा करावी, असे आवाहन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.

जि. प. शाळा, वसतिगृह ताब्यात घेऊन ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करावेत
लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, लातूर ग्रामीण मतदार संघातील प्रत्येक गावात गाव तिथे लसीकरण केंद्र सुरु केले जावे, जिल्ह्यातील रुग्णालयात ग्रामीण भागातल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत ही गैरसोय दूर करण्यासाठी जेथे गरज आहे अशा ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, वसतिगृह ताब्यात घेऊन या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करुन दिले जावे, घराजवळ शिक्षण शासनाकडून जसे मिळते तसे घराजवळ आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध करुन दिले जावे, ग्रामीण भागातील गृह विलगिकरनमध्ये असलेली रुग्ण अनेकदा शेतात वास्तव्य करतात यासाठी रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा व्हावा, लसीकरण करताना एक गाव मोहीम हातात घेतल्यास त्या गावातील १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे असे सांगितले.

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या