28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeलातूरसरसकट नुकसानभरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू - राजू शेट्टी यांचा इशारा

सरसकट नुकसानभरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू – राजू शेट्टी यांचा इशारा

एकमत ऑनलाईन

औसा : निसर्गाच्या प्रकोपाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य संकटात सापडले आहे.परतीच्या पावसाने मराठवाड्यासह राज्यभर शेतीचे जवळपास 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.सरकारने या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी अन्यथा नोव्हेम्बर महिन्यात रस्त्यावर उतरू,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ,माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन,तूर,ऊस,फळबागांचे नुकसान झाले.या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी लातुर-उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी आले होते.औसा तालुक्यातील तुंगी, बोरफळ, उजनी, आशिव,बेलकुंड आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.नुकसानीची पाहणी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर – उस्मानाबाद संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी राजू शेट्टी यांना या भागातील सर्वच शेतकरी संकटात सापडले असल्याची माहिती दिली.

देशात अनंत संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनासारखे नैसर्गिक संकट असतानाही शेतकरी कष्ट करीतच राहिला. नैसर्गिक, कृत्रिम आणि मानवनिर्मित संकटाचा सामना करताना न डगमगता काळ्या आईची ओटी भरून जगाला जगवण्याचे काम शेतकरी करीत आहे.मात्र त्याच्या कष्टावरच निसर्गाने जणू कुऱ्हाड घातली.

शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले.आज शेतकरी हवालदिल झालेला असून त्याला केंद्र व राज्य सरकारने तातडीने मदत केली पाहिजे.महिना अखेरपर्यंत मदत मिळाली नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर शेतकरी आंदोलन करतील,असा इशारा शेट्टी यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान बोलताना दिला.
बोरफळ ,शिवली,वानवडा शिंदाळा, तुंगी, बेलकुंड, उजनी आशिव आदी गावच्या शेतकऱ्यांना भेटून त्यांनी धीर दिला.

या दौऱ्यात बहुजन रयत परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष राजीव कसबे,निराधार संघर्ष समितीचे दगडू बरडे, गणेश जगताप,विष्णू यादव,नागनाथ साळुंखे, शहाजी अण्णा सोमवंशी,अभिमान सुर्यवंशी, कृष्णा साळुंखे, सचिन चिकुंदरे, अशोक वीर,विश्वनाथ काळे,बलभीम सोमवंशी, आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिवृष्टी भागाची पाहणी करून आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयास धावती भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या