22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरशहरातील सर्व फेरीवाल्यांनी ओळखपत्र तातडीने हस्तगत करावे

शहरातील सर्व फेरीवाल्यांनी ओळखपत्र तातडीने हस्तगत करावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शहरातील सर्व फे रीवाल्यानी ओळखपत्र तातडीने हस्तगत करावेत, अन्यथा त्यांचे साहित्य जप्त केले जातील, अशा ईशारा लातूर शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी दिला आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकामध्ये लातूर शहरातील २९७६ लाभार्त्यांचे पथविक्रेता सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्या पैकी १७६३ लाभार्त्यानी आपले कागदपत्र जमा करण्यात आलेले आहेत. उर्वरित १२१३ लाभार्त्यानी आपले कागदपत्रे तातडीने महानगरपालिकेत दाखल करावे. अशा सूचना आयुक्त अमन मित्तल यांनी कळविलेले आहे. याच बरोबर ज्याचे ओळखपत्र तयार झाले आहे त्यांनी तातडीने क्षेत्रीय कार्यलयामधून हस्तगत करावे अन्यथा ज्यांचेकडे ओळखपत्र नाही अशा फेरीवाले यांचे साहित्य दि. ६ जून २०२२ पासून थेट जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे. अशी माहिती आयुक्त अमन मित्तल यांनी दिली आहे.

लातूर शहरामध्ये ज्या विक्री क्षेत्रामध्ये आपणास ओळखपत्र देण्यात आलेले आहे. त्याच ठिकाणी आपला व्यवसाय करणे बंधनकारक असणार आहे. अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी व ना-फेरीवाला क्षेत्र या ठिकाणी आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक किवां जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे. तरी ज्यांचे ओळखपत्र आलेले आहे त्यांनी आपले तातडीने ओळखपत्र हस्तगत करावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने केलेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या