लातूर : प्रतिनिधी
शहरातील बौद्ध उपासक व उपासिकांची व्यापक बैठक येथील समतानगरमधील बुद्ध गार्डन येथे मंगळवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मार्चमध्ये घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. धम्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत ही धम्म परिषद होईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष हिराचंद गायकवाड, कुमार सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष मोहन माने यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली धम्म परिषद होईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. बैठकीला माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अॅड. एस. एन. बोडके, माजी नगरसेवक चंद्रकांत चिकटे, बसवंतप्पा उबाळे, अॅड. बाबासाहेब गायकवाड, प्रा. अनंत लांडगे, किशोर चक्रे, अशोक कांबळे, प्रा. हर्षवर्धन कोल्हापूरे, राहूल कांबळे, बालाजी कांबळे, प्रा. विलास घारगावकर, अशोक देडे, रमेश शृृंगारे, रामराव गवळी, व्ही. के. आचार्य, ज्ञानोबा कांबळे, डी. टी. सूर्यवंशी, प्रा. सिद्धार्थ सुर्यवंशी, सहदेव मस्के, सचिन गायकवाड, सचिन गंगावणे, लाला गायकवाड, त्र्यंबक गायकवाड, बाळू मस्के, पप्पू सरवदे, दत्ता कांबळे, किसन कांबळे, अॅड. अतिष चिकटे, अनिरुद्ध लामतूरे, एम. एस. गायकवाड, राजकुमार सकपाळ, विजय शृृंगारे, रुपेश गायकवाड, राजू माने, बी. एम. कांबळे, मोतीराम कांबळे, देवदत्त बनसोडे, प्रकाश कांबळे, दिलीप गोबाळ, दीपक गवळी, दत्तात्रय ठवळे, वैभव आचार्य, उत्तम लामतूरे, रोहीत कांबळे, रोहन कांबळे, शैलेश कांबळे, व्ही. एस. कदम, संदीपान क्षीरसागर, विजय कांबळे, एम. सी. कांबळे, प्रा. कल्याण कांबळे, चंद्रकांत कांबळे, प्रशांत कांबळे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य चित्रपट परिक्षण मंडळाचे सदस्य नागसेन कामेगावकर यांनी आभार मानले.