21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरसर्वपक्षीय ओबीसींचा २४ जुलैला लातूरात जागर मेळावा

सर्वपक्षीय ओबीसींचा २४ जुलैला लातूरात जागर मेळावा

एकमत ऑनलाईन

लातूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित केले आहे. याचा फटका समाजातील ५६ हजार लोकप्रतिनिधींना बसणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावे या मागणीसाठी लातूर ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शनिवार दि. २४ जुलै रोजी लातूर येथे ओबीसींचा जागर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून आरक्षण पुनर्स्थापित करण्या संदर्भात जनजागृती केली जाणार असल्याची माहिती कृती समिती सदस्यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द ठरले आहे. त्याचा ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भात सरकारवर दबाव आणण्यासाठी,ओबीसी जनजागृती करून आंदोलन उभारण्यासाठी शनिवार दि. २४ रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १ या कालावधीत सावेवाडी येथील शाम मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नावर चिंतन करुन पुढील आंदोलनाची दिशा या मेळाव्यात ठरवण्यात येणार आहे.

या मेळाव्यास राज्यातील व्हीजेएनटी, ओबीसी जनमोर्चा सर्व समन्वयक उपस्थित राहणार आहेत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य अ‍ॅड. अण्णाराव पाटील हे राहणाार आहेत. उद्घाटनास लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार रमेश कराड, आमदार राजेश राठोड, माजी आमदार वडकुते, व्हीजेएनटी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, अनिल खरमाटे, ईश्वर बाळबुधे, बालाजी शिंदे, नारायण मुंडे, जि. प. चे सभापती गोविंद चिलकुटे, औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, रेणापूर नगरपंचायतचे उपाध्यक्ष अभिषेक आकनगिरे, अहमदपूरच्या उपनगराध्यक्षा मीनाक्षी रेड्डी, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, शैलेश गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते अ‍ॅड.दीपक सूळ, अ‍ॅड. दीपक मठपती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांची उपस्थिती राहणार आहे.

जागर मेळावा पूर्व तयारी बैठकीस आरक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, रघुनाथ मदने, नगरसेवक राजा मणियार, वेंकट वाघमारे, विजयकुमार साबदे, आयुब मणियार, सपना किसवे, प्रा. धनंजय बेडदे, प्रा. महादेव बरुरे, अविष्कार गोजमगुंडे, राजेश खटके, प्रा. एकनाथ पाटील, अजित निंबाळकर, व्यंकटेश पुरी, अशोक मलवाडे, पद्माकर वाघमारे, सुदर्शन बोराडे, श्रीनिवास अकानगिरे, श्रीकांत मुद्दे, दगडूसाहेब पडिले, सुरज राजे, रंगनाथ घोडके, अजीज बागवान, असिफ बागवान, अ‍ॅड. प्रदिपसिंह गंगने, तर सौदागर, हमिदपाशा बागवान, विशाल चामे, सुरज कोल्हे, विजय टाकेकर, अनंत चौधरी, संजय क्षीरसागर, प्रमोद पांचाळ, इस्माईल फुलारी, शिवाजी पन्हाळे, अनिरुद्ध येचाळे, एच जी ंिनबाळकर, विजय खोसे, कल्याण पाटील, महादेव माडगे,उमेश कांबळे, अमोल बुरबुरे, व्ही एच केदार, यांच्यासह सर्वपक्षीय ओबीसी नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मान्यवरांना निमंत्रण
या मेळाव्यासाठी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे मान्यवर नेते ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.

विनातिकीट प्रवाशांवर रेल्वे विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या