25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरलातुरात ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीयांची वज्रमुठ

लातुरात ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीयांची वज्रमुठ

एकमत ऑनलाईन

लातूर : ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातून विविध पक्ष व संघटनाच्या वतीने आंदोलने छेडली जात असताना या आंदोलनाला वेगळी दिशा देऊन मागणी संदर्भात जनजागृती व आंदोलनात सुसुत्रता आणण्यासाठी लातूर येथे ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळावा दि. २४ जुलै रोजी झाला. या मेळाव्याने आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद उपस्थितीत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. राज्यपातळीवरील मान्यवरांनीही या मेळाव्यात मार्गदर्शन करून आपण आरक्षणाच्या मागणीसाठी कायम सोबत असल्याचे सांगितले.ओबीसी आरक्षण पुनर्स्थापीत करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी लातूरच्या भुमीतून वज्रमुठ आवळली.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगीत केल्यानंतर ते पुनर्स्थापीत करावे या मागणीसाठी ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शनिवारी लातूर येथे आरक्षण बचाव जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या मेळाव्यास राज्यपातळीवरील नेत्यांनीही संबोधीत केले. राज्याचे मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ऑनलाईन माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी आमदार राजेश राठोड, माजी आमदार रामराव वडकुते, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख, राज्यातील ओबीसी समन्वयक बालाजी शिंदे, दादासाहेब मुंडे, नवनाथ पडळकर, सुशीलाताई मोराळे, मुख्य संयोजक अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, रघुनाथ मदने, आयुब मणियार, प्रा. एकनाथ पाटील, सुरज राजे, अनिल पुरी, श्रीनिवास अकनगिरे, राजेश खटके, व्यंकट पन्हाळे, हरिभाऊ गायकवाड, नगरसेवक राजा मणियार, सपना किसवे, विजयकुमार साबदे, चंद्रकांत मद्दे, विजयकुमार पिनाटे, धर्मवीर भारती, ओमप्रकाश आर्य, राजपाल भंडे, श्रीकांत मुद्दे, सुरज राजे, ताहेर सौदागर, नामदेव ईगे, अविष्कार गोजमगुंडे, अजीज बागवान, अशोक मलवाडे, अजित निंबाळकर, दगडूसाहेब पडिले, रंगनाथ घोडके, राहुल जाधवर, राजेश गुंठे, राम गोरड, अ‍ॅड. प्रदीपसिंह गंगणे यांच्यासह मान्यवरांनी आपआपल्या संस्था व संघटनाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीला पांिठबा व्यक्त केला.

प्रयत्नाची पराकाष्ठा करु : छगन भुजबळ
या मेळाव्याला ऑनलाईन मार्गदर्शन करताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाचे पाय ओढण्याचे काम आजवर करण्यात आलेले आहे. इम्पेरिकल डाटा न दिल्याने आरक्षण स्थगित झालेले आहे. हा डाटा ही कोणच्या घरची संपत्ती नाही. केंद्र सरकारने तो दिला नाही तरीही न्यायालयात सादर करण्यासाठी डाटा जमा करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. आरक्षण कायम रहावे यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जात आहोत. राज्य सरकारने त्यासाठी आयोगाची स्थापना केलेली असून डाटा जमा करण्याचे काम सुरु आहे, असेही ते म्हणाले.

आरक्षण लढ्यासाठी तुमच्या सोबतच : पंकजाताई मुुंंडे
माजी मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, आरक्षण ही ओबीसीची कवचकुंडले असून ही कवचकुंडलेही हिरावून घेण्याचे काम झालेले आहे. आरक्षण पुर्ववत व्हावे यासाठी सर्वच समाजबांधवांनी पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन एकत्रीत लढा देणे आवश्यक आहे. हा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरु ठेवणे गरजेचे असून या लढण्यात मी कायम तुमच्यासोबत राहील असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिला.

ओबीसीची नवी मशाल पेटविणार : विजय वडेट्टीवार
मेळाव्याला संबोधीत करताना राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माती व नाती हे ओबीसी समाजाचे समिकरण असल्याचे सांगितले. आता जातीच्या पलीकडे जाऊन नाते जोडायचे आहे. ओबीसी हा अनेक जातींचा समुह आहे. या सर्व जातींसाठी नवी मशाल पेटवायची आहे. सर्वांनीच आपआपल्या पक्षाचे जोडे बाहेर ठेऊन मुठ बांधायची आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, कोणाचे आरक्षण हिसकावून घेणार नाही परंतू जे आजपर्यंत आमच्यासाठी होते ते सोडणार नाही. संसदेत कांहीही झाले तरी आम्ही लढा सोडणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सर्वपक्षीय ओबीसी एकत्रित आल्याचा आनंद : विक्रांत गोजमगुंडे
आपल्या उद्घाटनपर भाषणात महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या न्याय मागण्या आणि हक्कांसाठी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी एकत्र आले याचा मनस्वी आनंद वाटतो. आरक्षण हा समाजाचा हक्कच आहे पण असे असतानाही इम्पेरिकल डाटा वेळेत न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते स्थगित केलेले आहे. हे आरक्षण पुनर्स्थापीत होईपर्यंत आपण स्वस्थ बसू नये त्यासाठी सर्वपक्षीय नेते व पदाधिर्का­यांनी एकत्र येऊन योग्य दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे.

ओबीसींसाठी न्यायालयीन लढा उभारणार : अ‍ॅड. अण्णाराव पाटील
ओबीसींचा न्याय हक्क मिळावा यासाठी न्यायालयीन लढा उभारणार असून न्यायालयात आपण ओबीसींची योग्य बाजू मांडणार आहोत. ओबीसींना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मनोगत अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले.

कारवाडीच्या शिक्षकाला मन की बात कार्यक्रमाचे निमंत्रण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या