34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरसर्वच यंत्रणांनी जबाबदारी लक्षात घेऊन काम करावे

सर्वच यंत्रणांनी जबाबदारी लक्षात घेऊन काम करावे

एकमत ऑनलाईन

लातूर : कोवीड-१९ च्या दुस-या लाटेचा वाढता पादूर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपल्या जबाबदा-या विभागून घेऊन अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत व्हावे कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्या वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, मार्गदर्शक सुचनांची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन जिल्ह्यातील जनतेनी याकामी सकारात्मक राहून स्वता:ची काळजी घ्यावी, असे आवाहन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना आखून त्यावरील अंमलबजावनीचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी व्हिडीओ कॉन्फगसिंगव्दारे लातूर जिल्ह्यातील सर्व संबंधित पदाधिकारी व अधिका-यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, महापालीका आयुक्त अमन मित्तल, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. उदय मोहिते, डॉ. हरीदास हे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून तर सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील एकूण कोवीड-१९ प्रादूर्भावाची व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवीण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावनी करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षी एवढी रुग्णसंख्या वाढू नये याची दक्षता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मिळून घ्यावयाची आहे असे निर्देश त्यांनी दिले.
शहरांमधून प्रादूर्भाव अधिक, यंत्रणांनी सजग रहावे

जिल्ह्यातील एकूण रूग्णवाढीचा आढावा घेतला असता ग्रामिण भागाच्या तुलनेत लातुर व जिल्हयातील इतर शहरात रुग्णसंख्या अधिक गतीने वाढतांना दिसत आहे, त्यामुळे शहरातील कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी वेगळे नियोजन करून त्यांच्या अंमलबजावणीवर जास्तीचे लक्ष देण्याच्या सुचना दिल्या. एकदा रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील रुग्ण शोधण्यासाठी जलद मोहिम राबवावी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहनही पालकंत्री अमित देशमुख यांनी केले.

मृत्युदर कमी राहील याची काळजी घ्यावी
वेळेत चांगले उपचार मिळाल्यानंतर रुग्णांचा मृत्युदर कमी राहतो हा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी जास्तीत जास्त टेस्ट करून रूग्ण लवकरात लवकर उपचारासाठी येईल याचे नियोजन करावे त्यासाठी महसुल व इतर यंत्रना त्यांना सहकार्य करतील असे त्यांनी म्हटले.

पोलीस यंत्रणांनी सक्ती करु नये
सद्या कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे त्याची प्रभावी अंमलबजावनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेनी करावी हे करीत असतांना कोठेही सक्तीचा वापर न करता समजावून सांगने, प्रसंगी चर्चा करावी असे निदे्रशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

तपासणी वाढवाव्यात
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तपासणीची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सर्व तहसिलदार व आरोग्य अधिकारी यांना सांगितले तपासणी वाढविण्यासाठी फार्मासिष्ट, आर्युवेदीक तसेच होमिओपॅथी संस्था यांची मदत घेणे शक्य आहे का हेही जिल्हाधिकारी यांनी तपासुन पहावे असे त्यांनी म्हटले आहे. खाजगी लॅब मधून होणा-या तपासण्यांची जिल्हा प्रशासनाकडे नोंद होते किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी म्हटले होते. त्या अनुषंगाने बोलतांना जिल्ह्यात येणा-या. एकूण तपासणी किटची नोंद व्हावी जेणे करून रुग्णांची नेमकी संख्या लक्षात येईल. शिवाय त्या रुग्णावरील उपचार आणि त्यांच्या संपर्कातील उपचार याची माहिती मिळू शकेल, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

वर्क फॉर्म होमवर भर दयावा
शहरातील कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी या मिनी लॉकडाऊनच्या काळात वर्क फॉर्म होम बाबत जागृती करुन त्याची अंमलबजावनी होईल यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी. शाळा, कॉलेज, शिकवणी, होस्टेल यावर लक्ष ठेवावे असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागाशी सलग्न सर्व संस्थाचा सहभाग घ्यावा
कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या कामी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित असलेली वैद्यकीय महाविदयालये, आर्युवेदीक, होमिओपॅथिक, नर्सीग, औषधशास्त्र महाविद्यालये यांचे सहकार्य घ्यावे, गरज पडल्यास या ठिाकाणी कोविड केअर सेंटर उभारावेत अशी सुचनाही त्यांनी केली.

रेमडेसीवीरची कमतरता भासणार नाही अधिकचे दर घेणा-यांवर कडक कार्यवाही
कोवीड रुग्णांच्या उपचाराच्याबाबतीत शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी दक्ष रहावे औषधे, एक्स-रे व इतर तपासण्या यांचे दर निश्चीत केलेले आहेत त्यापेक्षा अधिकचे दर कोणीही घेणार नाही यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे असे सांगून रेमडेसीवीर इंजेक्शनची यापूढे कमतरता भासणार नाही असेही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. रेमडेसीवीर इंजेक्शनचा पूरेसा साठा लातूर जिल्ह्यासाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने संबंधित कंपनी व प्रशासनाला सुचना दिलेल्या आहेत. या उपरही अडचणी येत असतील तर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याशी संपर्क करावा ते याकामी आवश्यक ते सहकार्य करतील असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

अतिदक्षता बेडची संख्या वाढवावी
लातूर जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी रूग्णालयातील एकूण बेडची संख्या त्यापैकी अतिदक्षता विभागातील बेडची संख्या याची माहिती घेतल्यानंतर अतिदक्षता बेडची संख्या वाढवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेला दिले आहेत. लातूर येथील सुपरस्पेशलीटी हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या कोविड डेडीकेटेड रुग्णालयात आणखी वॉर्ड सुरु करावेत तसेच वैद्यकीय महाविदयालयाने अतिदक्षता विभागाचा विस्तार करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या. या ठिकाणीकिंवा जवळपास कोविड केअर सेंटर सुरु करता येते का ते पहावे, वैद्यकीय महाविदयालयातील सर्व यंत्रणा कार्यन्वित ठेवावी. एक्स-रे, व्हेटीलेटर यासारख्या यंत्रणा नादूरुस्त राहणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले.

जिल्ह्यात १0६२ नवे कोरोना रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या