26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeलातूरमांजरा नदीकाठच्या १८६ गावांतील सर्व पाझर तलाव एकमेकांना जोडणार

मांजरा नदीकाठच्या १८६ गावांतील सर्व पाझर तलाव एकमेकांना जोडणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मांजरा नदीकाठच्या १८६ गावांतील सर्व पाझर तलाव एकमेकांना जोडण्याची नवीन लातूर वॉटर ग्रीडची संकल्पना राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मांडली असून याचा अभ्यास करुन आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत अधिका-यांना दिल्या आहेत.

लातूर शहराला पाणीपुरवठा होणारे मांजरा धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून नदीवर ठिकठिकाणी उच्चस्तरीय बंधा-यांंची (बराजेस) उभारणी बंधा-यांच्या साखळीमुळे मांजरा नदीत बारमाही पाणी उपलब्ध झाले असून नदीकाठच्या शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मांजरा नदीवरील बराजची संकल्पना प्रत्यक्षात आणली. आता पालकमंत्री अमित देशमुख यांनी एक पाऊल पुढे टाकत मांजरा नदीकाठच्या १८६ गावांतील सर्व पाझर तलाव एकमेकांना जोडण्यची नवीन लातूर वॉटर ग्रीडची संकल्पना मांडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या