23.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home लातूर सर्व व्यवहार सुरळीत; बाजारपेठेत रौनक

सर्व व्यवहार सुरळीत; बाजारपेठेत रौनक

एकमत ऑनलाईन

लातूर : कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागु करण्यात आलेला लॉकडाऊन दि. १३ ऑगस्टपासूनच शिथील करण्यात आला होता. मात्र १३ ते १५ हे तीन दिवस जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी-विक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. दि. १६ ऑगस्ट रविवार सुटीचा दिवस आला आणि दि. १७ ऑगस्टपासून संपूर्ण बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून बाजारपेठीतील व्यवहार सुरळीत सुरु झाले. गेली १५ दिवस निर्मनुष्य असलेल्या शहरात गजबज वाढली.

लॉकडाऊन उठविण्यात आला असून सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत शासनाने बंदी घातलेली दुकाने वगळून इतर सर्व
दुकाने सुरु राहणार आहेत, असे आदेश पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरुन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. त्यानूसार सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच बाजारपेठेत रेलचेल सुरु झाली. खरे तर दि. १३ ऑगस्टपासूनच लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली होती. १३ ते १५ या तीन दिवसांत किराणा, भूसार, भाजीपाला, फळे, दुध, मटन, चिकन, अंडी आदी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आलेली होती. दि. १७ ऑगस्ट रोजी बाजारपेठेत एकच गर्दी होऊ नये म्हणून उपरोक्त तीन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिलेले होते. सोमवारी सर्वच बाजारपेठ सुरळीतपणे सूरु झाली.


लॉकडाऊनमुळे बंद असलेली बाजारपेठे सोमवारी उघडताच नागरिकांनी खरेदीसाठी विविध दुकानांत जाऊन आवश्यक साहित्यांची खरेदी केली. किराणा, भूसार मालासह भाजीपाला, फळांची मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री झाली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकांनी रेनकोट, छत्रीची खरेदी केली. कापड लाईन, सराफ लाईन, मिरची लाईनमध्येही बर-यापैकी उलाढाल झालेली दिसून आली. लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंज गोलाईत १५ दिवसांनंतर व्यवहार सुरळीत झाले. खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गंज गोलाईत आले परंतू, नागरिकांनी घरातून बाहेर पडतानाच आपल्या चेह-यावर मास्क किंवा रुमाल लावलेला दिसून आला. खरेदी-विक्री करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत असल्याचेही निदर्शनास आले.

खरेदी करताना जरा हात आखडताच
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला, अनेकांच्या हातचे काम गेले, अनेकांच्या खाजगी नोक-या गेल्या त्यामुळे नागरिकांकडे पैसा तसा नाहीच. त्यात लॉकडाऊनमुळे लग्नसराई, रमजान, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, राखी पौर्णिमा, बकरी ईद आदी सणांची खरेदी-विक्री झालीच नाही. त्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला. आता शेतक-यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला बैल पोळा असला तरी या सणानिमित्त लागणा-या वस्तूंच्या खरेदीसाठी थोडा हात आखडताच घ्यावा लागल्याचे चित्र बाजारपेठेत पहावयास मिळाले. बैल पोळ्यासाठी आवश्यक साज आणि इतर वस्तूंनी बाजारपेठ नटली असली तरी कोरोनाच्या फटक्यामुळे दरवर्षाप्रमाणे होणारी आर्थिक उलाढाल झालेली नाही.

सोलापूर ग्रामीणमध्ये १७४ कोरोनाबाधित रुग्ण तर शहरात ५३ नवे बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या