लातूर : प्रतिनिधी
प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूरच्या वतीने गंजगोलाई व अण्णाभाऊ साठे चौक तसेच शनिदेव या देवालय परिसरात वंचित व गरजू लोकांना पावसाळी मोसमात पावसापासून शरीराचा बचाव करण्यासाठी कवच (कुंची) वाटप करण्यात आले. प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर वतीने पावसासपासून शरीर भिजू नये व त्यापासून आजार होऊ नये या करिता पावसाळी मोसमात गरजू व वंचित लोकांना पावसापासून बचावासाठी शरीर कवच (कुंची) वाटप करण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. जेणे सध्या पावसाळी वातावरण वाढत असल्याने प्रत्येकजण पावसापासून शरीर भीजु नये व आजार होऊ नये याची काळजी घेत आहे.
शरीर भिजू नये या करिता पावसाळी कपडे परिधान करतात. त्याच परिस्थितीत लातूर शहरात बेघर आणि निराधार लोकांना कशाचा तरी आसरा घेत निपुटपणे शरीर भिजून कुडकुडत बसत व झोपत असतात. त्यांचाही पावसापासून बचाव व पाण्याचा सामना करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठाणने पुढाकार घेऊन वंचित लोकांना त्यांचे पावसाच्या पाण्यामुळे शरीर भिजू नये व आजारास सामोरे जाऊ नये या करिता मायेची चादर पांगरण्यात आली. तसेच वंचित, गरजू लोकांचा शोध घेत त्यांची सेवा करण्याकरिता ते दिसून येताच सामाजिक बांधलकी जपून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जसे जमेल तसे सहका-यांच्या साहाय्याने अंग कवच (कुंची) वाटप करून कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. अजय कलशेट्टी, अॅड.सुरेश सलगरे, डॉ. संजय जमदाडे, अमर साळुंके, आजुभाऊ पल्लोड, दत्ता ढगे, शाम मोरे, बंडापा जवळे, मोतीराम कदम, शिवाप्पा धुळे, शेख हुसेन, सुनील कोटलवार, आनंद जवळे, शिवा रोडे, मुन्ना बट्टेवार, दीपक प्रयाग, सौरभ कलशेट्टी, रवी घुगरे, अंिजक्य रेड्डी, राम डूमने, आदीनि परिश्रम घेतले.