22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरदुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या

दुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या

एकमत ऑनलाईन

लातूर : अत्यावश्यक सेवेतील दुकानांसोबतच अन्य दुकाने उघडायला जिल्हा प्रशासनाने विनाविलंब परवानगी द्यावी या मागणीसाठी दि. १७ मे रोजी दुकाने उघडायला परवानगी द्या, नाही तर दुकाने ताब्यात घ्या, असे फलक घेऊन लातुरात व्यापारी महासंघाच्या वतीने आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. व्यापा-यांनी काळ्या फिती बांधून आपला विरोध दर्शवला. कोरोना विषाणूचा संसर्ग आता हळू – हळू ओसरत चालला असून नव्याने बाधित होणा-या रुग्णांची संख्याही घटत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकानांसोबतच आता इतर व्यापारी वर्गालाही आपआपले व्यवसाय, दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी सुभाष चौक ते गंजगोलाई, भांडीगल्ली, सराफगल्लीत सर्व दुकानांसमोर हातात दुकाने उघडण्याच्या मागणीचे फलक घेऊन व्यापारी महासंघाच्या पदाधिका-यांनी हे आगळे – वेगळे आंदोलन केले.

या आंदोलनात भांडी असोसिएशनचे राघवेंद्र इटकर, फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष मुस्तफा शेख, स्टेशनरी असोसिएशनचे अतिश अग्रवाल, विश्वनाथ किनीकर, विशाल अग्रवाल, मनिष बंडेवार, राज धूत, विनोद गिल्डा, भारत माळवदकर, दत्तात्रय पत्रावळे, मोहन रामेगांवकर, राजू डावरे, विनायक चनागीरे, चंद्रप्रकाश सोलंकी, जुबेदखान पठाण, अमित इटकर, सुशील राठी, श्रीराम डागा, समीर डांगरे, आनंद खंडेलवाल, रमेश सेठ, केतन ठक्कर, इम्तियाज शेख, कलीम शेख, इमरान पटेल, तज्जमूल मणियार,अजहर मणियार, अरुण हमीने, जावेद पटेल आदी व्यापारी महासंघाच्या विविध असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या