लातूर : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे वक्तृत्व, तरुण नेतृत्व, विकास कामे करण्याची हातोटी आणि त्यांची ग्रहदशा पाहिली तर भविष्यात ते नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रमलविद्या भविष्यवेता एस. बी. बोरालकर यांनी व्यक्त केले. रमलविद्याल भविष्यवेता बोरालकर दि. ३० ऑगस्ट रोजी लातूरला आले होते. त्यांनी येथील बार्शी रोडवरील संगमेश्वर बोमणे यांच्या संगम हायटेक नर्सरी येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, भविष्यात म्हणजेच सन २०३० च्या आत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परळीचे आमदार धनंजय मुंडे होतील. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री पदाची आशा करु नये. कारण ते केंद्रीय राजकारणात जाणार आहेत.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळेच या भूमीवर कोरोनाचा कहर झाला नाही. खरे तर कोरोना ही महामारी नाहीच, असा दावा करताना बोरालकर म्हणाले की, येत्या सप्टेंबर ऑक्टोंबरपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत जाईल आणि कोरोना संपले. आरोग्य खात्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उधळलेल्या निधीचे ऑडीट केले जावे, अशी मागणी करुन लोक केवळ कोरोनाच्या धसकीने मरत असल्याचेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आपल्या देशावर अतिरेक्यांच्या होणा-या हल्ल्यांबाबत देशाच्या गृहविभागाला भाकित कळवले होते.
मात्र गृहविभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले. माझ्या भाकितानूसार उपाययोजना केल्या असत्या तर अतिरेक्यांचे हल्ले रोखता आले असते, असा दावाही त्यांनी केला. इतकेच नव्हेत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भाने खळबळ उडवून देणारी विधाने केली आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यातील सरकार अडचणीत येणार!
महाराष्ट्र राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाआघाडीची सत्ता येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अडचणीत येणार आहे. नाराज काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार, सत्ता पाडण्याचे भाजपा डावपेच खेळणार परंतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आपली प्रतिष्ठा पुर्णपणे पणाला लावून सत्ता वाचवणार, असेही बोरालकर म्हणाले.
परीक्षा, सुरक्षा आणि राज्य सरकारचे अधिकार !