23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात अमृत महोत्सव उत्साहात

शिरूर अनंतपाळ तालुक्यात अमृत महोत्सव उत्साहात

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शहरासह संपूर्ण तालुक्यात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, स्वातंत्र्य काळातील व्यक्तींची वेशभूषा, ढोल ताशांसह लेझिम नृत्य तसेच विविध स्पर्धा घेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपकृमांनी उत्साहात साजरा झाला. शहरी व ग्रामीण भागात सकाळपासून उत्साह पहायला मिळाला. त्यात पाऊस नसल्याने उत्साहात भर पडली होती. अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध कार्यालये, शाळांच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीत फुगे तसेच फुलांनी सजावट करण्यात आली होती .तहसील कार्यालयात तहसीलदार अतुल जटाळे यांच्या हस्ते, पंचायत समिती गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा सौ. मायावती धुमाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, आस्थापना या ठिकाणीही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात आले. तहसील,नगरपंचायतमध्ये सेल्फी पॉईंट’ तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य काळातील साकारलेल्या विविध वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या रुपात प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला. विविध संघटनांनी स्पर्धा घेतल्या. दिवसभर उत्साही वातावरण होते. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा’ या आवाहनानुसार शिरूर अनंतपाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद लाभला. अनेकांनी उत्साहाने तिरंगा उभारून राष्ट्रप्रेम जागवले.तर गावागावात उत्साही वातावरण पहावयाला मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या