30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

एकमत ऑनलाईन

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत असल्याचे पेट्रोल पंपावरील कर्मचा-याच्या लक्षात येताच या घटनेची माहिती पंप मालकाला भ्रमन ध्वनीद्वारे दिली. त्यानंतर मालक व काही लोक आल्याचे पाहून सोबत आणलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.

रेणापूर-खरोळा रोडवर असलेल्या विघ्नहार पेट्रोल पंपावर एका ट्रकमधून २० ते २५ अज्ञात चोरटे पेट्रोल पंपावर डिझेल चोरण्यासाठी कँड व डिझेल काढण्याचा हतपंप घऊन आले होते. सदर चोरट्यांनी पंपावरील डिझेल टॅकचे झाकण उघडून डिझेल काढण्याचा प्रयत्न करीत असताना पेट्रोल पंपावरील कर्मचारी खंडू भिंगे, राहूल कांबळे हे बाजूच्या खोलीत झोपले होते. ते लघवीसाठी बाहेर आले. लघवी करून रुम मध्ये परत जात असताना त्यांची नजर डिझेल टाकीकडे गेली. त्याना काही जण डिझेल काढीत असल्याचे दिसले. हा डिझेल चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पट्रोल पंप मालक कुमार पाटील यांना सदरची बाब भ्रमणध्वनीद्वारे कळवली.

चोरट्यांना याची चाहूल लागताच चोरट्याने सोबत आणलेले साहित्य घेऊन जवळच उभ्या केलेल्या ट्रकमधून खरोळ्याकडे पोबारा केला.त्यानंतर काही क्षणातच तो ट्रक परत रेणापूरकडे गेल्याचे कर्मचारी व पंप मालकांनी पाहिले. त्यानंतर कुमार पाटील यांनी रेणापूर पोलीस ठाण्यास याची माहिती दिली. पोलिसांनी ट्रक आडविण्याच्या उद्देशाने ठाण्यासमोर नाकाबंदी केली. तेवढयात खरोळ्याकडून भरधाव वेगात येणा-या ट्रक चालकाने रस्ता आडविल्याचे पाहून बाजूच्या रस्त्याने पिंपळफाट्याकडे ट्रक नेला. पोलीसांनी लातूर-अंबाजोगाई रोडवर पेट्रोलीग करीत असलेल्या गाडीला सदरची बाब कळविली. तेव्हा सदरचा ट्रक पळशीकडे जात होता.

याच ट्रकच्या पाठीमागे पोलीस पाठलाग केला. सदर गाडीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागसेन सावळे, चालक बनसोडे, होमगार्ड राऊत व पंप मालक कुमार पाटील,राजू पाटील व इतर होते. दरम्यान सदरील ट्रक पळशी येथून लातूरकडे वळविला तो ट्रक बावची, बिटरगाव , वंजारवाडी , रवानापुर मार्गे अंबाजोगाईकडे गेला. ट्रकच्या मागे पोलीस गाडी पाठलाग करीत असल्याचे पाहून ट्रक मधील २० ते २५ अज्ञात चोरट्यांनी डिझेल भरण्यासाठी आणलेले कॅड व दोन हातपंप रस्त्यावर टाकून पोलीस अडथळा केला. याचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. पसार झालेल्या ट्रकचा क्र. एम.एच. १२ सी.टी २९ ९९ हा आहे. कुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलीसांनी गुरनं. ६५९ / २० कलम ३७९ , ५११ अन्वये अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यनंद काळे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम माच्चेवाड पो.कॉ. हुंडेकरी हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान डिझेल चोरण्यासाठी आणलेले ३० ते ३५ कॅड पोलीसाच्या हाती लागले आहेत.

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या