24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत सभागृह उभारावे

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत सभागृह उभारावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ७२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे. या निधीतून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी सभागृह, वाचनालय उभारावे, अशी मागणी बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन, लातूर हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव संयोजन समितीच्या वतीने येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
a
हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चालणा-या या अमृत महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवारी, दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार असल्याची माहिती हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्यावेळी सदर मागणी करण्यात आली. हा उद्घाटन सोहळा दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ लेखक निळू दामले यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात भाऊसाहेब उमाटे लिखित ‘शौर्यगाथा : हैदराबाद मुक्तिसंग्रामाची’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील जीवनधर शहरकर गुरुजी व मुर्गाप्पा खुमसे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहरात नवीन शासनामार्फत नवीन सभागृह निर्माण करण्याची मागणी लावून धरली जाणार आहे. तसेच वर्षभरात मराठवाड्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ७५ व्याख्यानांचे आयोजनही केले जाणार आहे. मराठवाडास्तरावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, गीत गायन स्पर्धाआयोजित केली जाणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे अ‍ॅड. गोमारे यांनी सांगितले.
यावेळी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष सूर्यकांत वैद्य, उपाध्यक्ष विधिज्ञ उदय गवारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. बी. आर. पाटील, माणिकराव कोकणे, रमेश चिल्ले, प्रा. दत्ता सोमवंशी, राजाराम बिलोलीकर यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या