19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeलातूरगांधींजीचा संदेश प्रत्यक्षात उतरविणारा उपक्रम : डोंग्रजकर

गांधींजीचा संदेश प्रत्यक्षात उतरविणारा उपक्रम : डोंग्रजकर

एकमत ऑनलाईन

लातूर प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने मराठवड्याच्या सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये ‘भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठीची निबंध स्पर्धा आयोजित करून तसेच विद्यार्थ्यांना प्र्रतिज्ञेचे स्टिकर्स वाटप करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाला प्रत्यक्षात उतरवले आहे. आजच्या बेगडी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ च्या वातावरणात एआयबीईएचा हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरतो. यातून देशाच्या भावी पिढीची भारताच्या स्फूर्तीदायी व आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्य लढ्याची उजळणी होते आहे व विद्यार्थ्यांना प्रेरणाही मिळते, असे प्रतिपादन ‘एकमत’ चे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांनी केले. पानचिंचोली येथे लोकमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोति स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, सचिव पंचाक्षरी, एआयबीर्ईएचे औरंगाबाद विभाग उपाध्यक्ष उत्तम होळीकर, गावातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार सत्यप्रकाश होळीकर, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलवे, मुख्याध्यापक पाटील उपस्थित होते.

लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पानचिंचोली, जयभवानी विद्यालय पानचिंचोली आणि बजरंग विद्यालय मुगाव या तीन विद्यालयांत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हसते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम बक्षीस, प्रमाणपत्र व रोख २ हजार रुपये, द्वितीय बक्षीस प्रमाणपत्र व रोख १ हजार रुपये तर तृतीय बक्षीस प्रमाणपत्र व रोख ५०० रुपये असे बक्षीसांचे स्वरूप आहे. पानचिंचोली येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. वासुदेवराव होळीकर यांच्या स्मरणार्थ विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आली.

उत्तम होळीकर यांनी संघटनेच्या उपक्रमाची माहिती देताना संघटनेच्या कायजमच समाजाशी असलेल्या बांधिलकीतूनच हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. तसेच यापुढेही संघटना असेच उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यास कटिबध्द असल्याची ग्वाही दिली. प्रास्ताविक मुख्याध्यापक दिवे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप विक्रम पाटील यांनी केला. वंदेमातरमने सोहळ्याची सांगता झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या