27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरनाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे गार्डन विकसीत होणार

नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे गार्डन विकसीत होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : अत्यंत वेगाने विकसीत होत असलेल्या लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जवळपास ३ एकर जागेत २ कोटी ३१ लाख रुपये खर्च करुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुवीधानियुक्त रविंद्रनाथ टागोर गार्डन विकसीत करण्यात येत असून या कामाची दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली. सदरील काम ठरवून दिलेल्या अराखडानुसार अत्यंत दर्जेदार पध्दतीने नियोजीत वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र म्हणून मराठवाड्यातील लातूर शहराचा अत्यंत जलद गतीने विकास होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने या शहराचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि पूढाकारातून विविध सोयीसुवीधा उभारण्यात येत आहेत. लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येत असलेले रविंद्रनाथ टागोर गार्डन त्यापैकीच एक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरीकासाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून हे गार्डन विकसीत केले जात आहे.

लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजस्थान शाळेच्या पाठीमागे प्रभाग क्र. १६ मध्ये जवळपास ३ एकर जागेमध्ये सदरील रविेंद्रनाथ टागोर गार्डन विकसीत होत आहे. या एकूण कामावर २ कोटी ३१ लाख रूपये खर्च होणार आहे. पामकोर्टच्या धर्तीवर या गार्डनची उभारणी होत असून प्रारंभी सुंदर, आकर्षक प्रवेशव्दार येथे बांधण्यात येत आहे. या गार्डनमध्ये आकर्षक पाथवे बांधण्यात येत आहे. शांत आणि मंगलमय वातावरण व्हावे म्हणून येथे मंदिरे उभारण्यात येत आहे. लहानमुलासाठी खेळण्यासाठी उच्च दर्जाच्या साहित्याची उभारणी येथे होणार आहे. आकर्षक लॉन, प्लाम कोर्ट, जॉगींग ट्रॅक, गॅझेबो, खेळाचे मैदान, बहूउद्देशीय व्यासपीठ व लॉन, विश्राम मंडप, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यासह आवश्यक त्या सर्व सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत. येथील बागेची आकर्षक मांडणी होणार आहे. सदरील गार्डनचे काम ठरवून दिलेल्या अराखडा प्रमाणे दर्जेदार पध्दतीने वेळेत पूर्ण करावेत, दर्जा बाबत कुठलीही तडजोड करु नये, संबंधित यंत्रणेने कायम लक्ष ठेऊन हे काम पूर्ण करावे, हा प्रकल्प पथदर्शी ठरावा यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, अशा सुचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या भेटीदरम्यान केल्या आहेत.

यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अ‍ॅड. समद पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपअभियंता रोहन जाधव, शाखा अभियंता अनिल जांभळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे, पुणे येथील वास्तुविशारद महेश नामपूरकर यांच्या संकल्पनेतून या बागेचे सुशोभीकरण करण्यात येत आह. कंत्राटदार प्रमोद बल्लाळ, मुकेश जाधव, मनपा क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, मनपा शाखा अभियंता प्रेमनाथ घंटे, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, आयुब मणियार, कैलास कांबळे, सिकंदर पटेल, ख्वॉजाबानू अन्सारी, दगडूसाहेब पडीले, प्रा. प्रवीण कांबळे, केशरबाई महापुरे, अकबर माडजे, विष्णुदास धायगुडे, पवन सोलंकर, अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच रविंद्रनाथ टागोर नगर परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या