21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरअज्ञात टेम्पोने मोटारसायकल स्वारास उडवून मोटारसायकल १५ किलोमीटर फरफटत नेली

अज्ञात टेम्पोने मोटारसायकल स्वारास उडवून मोटारसायकल १५ किलोमीटर फरफटत नेली

एकमत ऑनलाईन

जळकोट : एखाद्या चित्रपटात प्रसंग घडावा असा थरार जळकोट-जांब-उदगीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर घडला, एका अज्ञात टेम्पोंने जांब येथे एका मोटरसायकलवर असलेल्या तिघांना उडवले, यावेळी ती मोटरसायकल सदरील टेम्पोच्या समोरच्या चाकाला अडकली , टेम्पो चालकाने आणखीन सुसाट गाडी चालवली, तब्बल १५ किलोमीटर ही मोटारसायकल चाकाखाली फफटत नेली आणि आपोआप तिरुक्याजवळ ही मोटारसायकल बाजूला झाली. सदरील मोटारसायकल वरील तिघांचे दैव बलवत्तर म्हणून हे तिघेही जण थोडक्यात बचावले.

जळकोट येथील संजय लदे हे आपल्या बजाज मोटरसायकलवर दि सात ऑगस्ट रोजी आपल्या दोन भावांना घेऊन जांब येथे गेले होते सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर जांब येथील संजीवनी हॉस्पिटलच्या समोर , एका अज्ञात भरधाव वेगाने जाणा-या टेम्पोने मोटरसायकलला उडवले. उडवल्यानंतर सदरील टेम्पोचालकाने आपला वाहनाचा वेग आणखीनच वाढवला. मोटारसायकल टेम्पोच्या डाव्या बाजूकडील टायरला अडकली होती. वेग खूप असल्यामुळे रोडवर घर्षणामुळे प्रचंड आवाज व प्रकाश निर्माण होत होता. जळकोट शहरातील नागरिक या टेम्पो कडे बघतच राहिले. जांब येथून टेम्पो निघाल्यानंतर जळकोट पोलिस स्टेशनला कल्पना देण्यात आली . पोलिस स्टेशनचे पोलीस कासार हे रोडवर थांबले होते .

परंतु सदरील टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला असता . टेम्पो चालकाने गाडी थांबवली नाही . प्रचंड वेग असल्यामुळे पोलिसांना मागे सरकावे लागले . टेम्पोच्या पाठीमागे अनेक गाड्या लागल्या , तरीही टेम्पो चालकाने गाडी थांबवली नाही , कोळनूर येथील राम चोले यांनी देखील या टेम्पोचा पाठलाग केला. परंतु ९० ते १०० च्या वेगाने हा टेम्पो पुढे धावत होता, कुणालाही सापडला नाही . सदरील टेम्पोच्या टायर खाली अडकलेली बजाज मोटरसायकल तिरुका गावाजवळील उतारावर निघून पडली. यानंतर टेम्पो चालकाने आणखीन वेग वाढवला. जळकोट कडील वाहनधारकांनी घोणसीपर्यंत टेम्पोचा पाटलाग केला.

परंतु तो सापडला नाही, प्रचंड वेग असल्यामुळे समोर देखील कोणी थांबायला तयार नव्हते. चित्रपटात एखादा थरार घडावा असा प्रकार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर घडला . या अपघातामध्ये मोटरसायकलचा अक्षरशा चक्काचुर झाला आहे . मात्र यामध्ये सुदैवाने तिघांचे प्राण मात्र वाचले. एक जण किरकोळ जखमी झाला आहे , वाचलेल्या तरुणाच्या बाबतीत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या