30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeलातूररात्रीच्या अंधारी, निर्मनुष्य रस्त्यावर प्राण्यांची सेवा

रात्रीच्या अंधारी, निर्मनुष्य रस्त्यावर प्राण्यांची सेवा

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख ) :कोरोना महामारीत निघून चाललीत माणसं अगदी कुणाचाच निरोप न घेता… कष्टाने उभं केलेलं आयुष्य, गोडीने जपलेला संसार, चिमुकल्यांचे हसणे, जोडीदाराचें रागावणे, थोरा मोठ्यांचे आशिर्वाद, कधी कारण होते म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद… असूया, द्वेष, तिरस्कार, पैसा, मोह… सगळं सगळं मागे टाकून निघून चाललीत माणसं, असे कोणीतरी म्हटले. नेमकं अशाच परिस्थितीत रस्त्यावर भटकणा-या मोकाट कुत्र्यांचा कोण विचार करणार? परंतु, एक ज्येष्ठ महिला रात्रीच्या अंधारात, निर्मनुष्य रस्त्यांवर मुक्या प्राण्यांना प्रेमाने एकत्र बोलावून स्वत:च्या हाताने घास भरवत असल्याचे लातूर शहराच्या मेन रोडवर पाहिल्यानंतर माणुसकी अजून जीवंत आहे… याचा प्रत्येय आल्या शिवाय राहात नाही.

लातूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनही धास्तावले आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार लातूर जिल्ह्यात कडक निर्बंध जारी केले आहेत. रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचार बंदी तर सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलस्, खानावळींतून केवळ पार्सल सुविधेला परवानगी दिली आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यास बंदी आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळीच्या खरखट्यावर जगणारी भटकी कुत्री उपासमारीने व्याकुळ झाली आहेत. जीथे माणसंच्या पोटापाण्याची चिंता असताना या मुक्या प्राण्यांच्या पोटापाण्याची काय व्यवस्था? अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांसमोरे उपासमारीने मरण्याशिवाय पर्याय नाहीच.

परंतू, एक ज्येष्ठ महिला दररोज रात्री ११ वाजता शहरातील मेन रोडवर येते. घरुन आणलेला चपाती, भाकरींचा डबा उघडून कुत्र्यांना खाऊ घालते. त्यामुळे या कुत्र्यांनाही त्या महिलेला लळा लागलेला आहे. या महिलेस पाहताच आठ-दहा कुत्री त्या महिलेच्या अवती-भोवती गोळा होतात. ती महिला अत्यंत प्रेमाणे त्या कुत्र्यांना घास भरवते. कुत्रे पोटभर खाऊन झाल्यास रस्त्यावरच मस्तपैकी झोपून राहतात. ती महिला आपली सेवा झाल्यानंतर गुपचुप आपल्या घरी निघून जाते. पुन्हा दुस-या दिवशी तोच उपक्रम.

या ज्येष्ठ महिलेची भटक्या कुत्र्यांविषयीची निमुट सेवा ईश्वराला साक्षी माणुनच असेल, असे वाटते. कारण ही महिला रात्रीच्या अंधारी अगदी पावलांचा सुद्धा आवाज येऊ नये, याची काळजी घेत मेन रोडवर एकटी येते. महिलेस पाहताच कुत्रे धावत, पळत महिलेच्या दिशेने येतात आणि महिला हातातील डबा उघडून त्या कुत्र्यांना प्रेमाचा घास भरवते. माणसांना मदत करण्यासाठी माणसं धावत-पळत येतात. कोणीच नसेल तर सरकार आजरी माणसाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतेच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवरुन अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत, केल्या जातही आहेत. त्यातून माणवाला दिलासा मिळतही आहे. कोरोनाबाधितांची जितकी संख्या वाढत आहे तितक्याच प्रमाणात उपचाराने बरे होणा-यांची संख्या आहे. परंतू, मुक्या प्राण्यांचा विषय तसा दुर्लक्षीत असतो. अशा वेळी ‘ती’ ज्येष्ठ महिलेकडून होणारी मुक्या प्राण्यांची सेवा खरोखरच अनमोल अशीच आहे.

दुसरी लस घेऊनही १५ पोलिस बाधित; २५७४ पोलिसांनी घेतला पहिला डोस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या