लातूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे विचार, त्यांचे साहित्य, सामाजिक संघर्ष आणि संघर्षमय जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. लातूरच्या जडणघडणीत त्यांच्या विचाराचा पगडा राहिला आहे, त्यांच्या विचारांची जोपासणा करण्याचे काम आपण सर्वजण यापूढेही करु, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी कामगार, शोषित, उपेक्षित या समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी लिखाण करणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.. तसेच त्यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात येऊन गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश, गोरगरीब महिलांना साडी व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख शिवाजी माने, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अॅड. समद पटेल, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, पृथ्वीराज शिरसाठ, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरचे अध्यक्ष मिथुनकुमार गायकवाड, स्वागताध्यक्ष सुनील बसपुरे, लातूर जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, सुंदर पाटील कव्हेकर, अनिल शिंदे, संयोजक विकास कांबळे, अशोक देडे, कैलास कांबळे, मोहन माने, गोरोबा लोखंडे, वर्षा मस्के, आयोध्याबाई उपाध्ये, केशरबाई महापुरे, अॅड. जाबुवंत सोनकवडे, अॅड. अंगद गायकवाड आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे विविध पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊंचे विचार आपल्यासाठी कायम प्रेरणादायी आहेत, त्यांच्या विचारानुसार चालण्याची कायम आठवण राहावी म्हणून त्यांचा येथे पूणाकृती पुतळा उभारला आहे, असे नमूद करुन सर्वधर्म समभावाच्या विचाराची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे छत्रपती शाहू महाराज यांच्याही पुतळ्याचे अनावरण लवकरच होणार असल्याचे यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाला समान वागणूक आणि समान संधी देण्याचे धोरण लातूर शहरात यापूर्वी जाणत्या नेत्यांनी सातत्याने राबवले आहे. भविष्यातही ती परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्या माध्यमातून, शहराचा जिल्ह्याचा समतोल विकास साधला जाईल. अण्णा भाऊ साठे यांची जयंती आपण लातूर शहरात आनंदाने साजरी करतो. लातूरच्या जडणघडणीत त्यांच्या विचाराचा पगडा राहिला आहे. या विचाराची जोपासना यापूढेही आपण करणार आहोत अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना दिली.
लातूरची संस्कृती दिनदुबळे यांचा सन्मान राखण्याची आहे. तीच परंपरा आपण पुढे घेऊन जात आहोत, या विधायक आणि सेवाभावी कार्यात आम्ही तुमच्या सर्वांसोबत आहोत. महाराष्ट्र सरकारने मागच्या काळात अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे मी सांस्कृतिक कार्य विभागाला सूचना केली होती. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून मी मागच्या वेळी केंद्र सरकारकडे पत्र देऊन मागणी केली आहे. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक रशियात ज्या टाऊन हॉलमध्ये अभ्यास दौ-यासाठी गेले होते तेथेही स्मारक करावे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसराची सुशीभीकरण लातूर महानगरपालिकेने करावे, या चौकाकडे येणारे सर्व रस्ते दर्जेदार करावेत, चौक परिसरात सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, लातूरचे माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या खासदार निधीतून विवेकानंद चौक परिसरात सभागृह बांधले आहे. तेथे अण्णा भाऊंच्या अनुयायांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना केल्या आहेत.
यावेळी अॅड. अंगद सूर्यवंशी, अॅड. देविदास बोरुळे पाटील, सचिन बंडाप्पले, महेश गायकवाड, जी. ए. गायकवाड, विजयकुमार साबदे, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, सत्तार शेख, मोहन सुरवसे, विष्णुदास धायगुडे, रमेश सूर्यवंशी, रणधीर सुरवसे, आनंद वैरागे, सुपूर्ण जगताप, राज शिरसागर, प्रा. एम. पी. देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, अॅड. फारुख शेख, अतिश चिकटे, आसिफ बागवान, कुणाल वागजकर, यशपाल कांबळे, मैनुद्दीन शेख, अब्दुल्ला शेख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपी साठे यांनी केले.