25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeलातूरक्रांतीदिनी २४ डिसेंबर रोजी 'ग्रामस्वराज्य' संघटनेच्या स्थापनेची घोषणा

क्रांतीदिनी २४ डिसेंबर रोजी ‘ग्रामस्वराज्य’ संघटनेच्या स्थापनेची घोषणा

खासदार छत्रपती संभाजीराजे, अ‍ॅड. आंबेडकर उपस्थित राहणार

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : आदर्श धामणगावांत क्रांतीदिनी ‘ग्रामस्वराज्य’ संघटनेच्या स्थापनेचे घोषणा करण्यात आली असून २४ डिसेंबर रोजी स्थापना करण्यात येणा-या या ग्रामस्वराज्य संघटनेच्या स्थापनेला खासदार छत्रपती संभाजीराजे व अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती धनराज पाटील धामणगावकर यांनी दिली. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगष्ट रविवारी रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ग्रामीण भागाच्या समस्या सोडवण्यिासह खेड्यापाड्याच्या विकासाच्या पुर्तीसाठी ग्रामस्वराज संघटनेच्या माध्यमातून यांपुढे काम करणार आहे. ग्रामीण भागातील प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांच्या न्याय हक्कासाठी यापुढील जीवन समर्पित करणार असून सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी लढणारी व राजकीय पक्ष विरहीत अशी ‘ग्रामस्वराज्य संघटना ‘ समस्त राज्यभरात स्थापन करणार असल्याची घोषणा धामणगावकर यांनी केली.

स्वातंर्त्यानंतर ७० वर्षानंतर ही ग्रामीण भागात रस्ते,पाणी, वीज,आरोग्य व शिक्षण स्मशानभूमी शाळा या मुलभूत सुविधा नाहीत तर उपलब्ध आहे तिथ दुरवस्था झाली आहे. त्यात ग्रामीण व शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मिळणा-या विकास निधीत मोठी तफावत आहे.त्याबाबतीत लोकप्रतिनिधी आवाज उठवित नसल्याने गाव खेडे ओसाड पडत आहे. त्यांचा आवाज बनण्यासाठी बहुजन समाजातील तरुणांना एकत्र करून येत्या २४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत या ‘ग्रामस्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निमित्ताने ग्रामविकासाची एक नवी चळवळ उभारण्याचा संकल्प केला असून ग्रामीण भागात विकासाची क्रांती घडवून आणण्यासाठी काम करणार असल्याचे सांगून या ग्रामविकासाच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या संघटनेत ग्रामीण भागातील युवकांनी सामील व्हावे असे आवाहनही धनराज पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तरूणांना केले आहे.

पाकव्याप्त काश्मीरात रेल्वेमार्ग बांधण्याचा पाकचा डाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या