30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात आणखी २१७ रुग्ण वाढले; आणखी ५ बाधितांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात आणखी २१७ रुग्ण वाढले; आणखी ५ बाधितांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज नव्याने भर पडत आहे. मात्र, मागच्या काही दिवसांत रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र होते. मात्र, आज आणखी २१७ नवे रुग्ण सापडले. मात्र, नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यातील रिकव्हरी रेट रोज वाढत आहे. आज तब्बल २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तथापि, आणखी ५ बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ४७६ वर गेला आहे.

जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १६ हजार ८०६ वर गेली आहे. मात्र, आतापर्यंत १३ हजार ४८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात २ हजार ८४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अलिकडे रोज कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या दिलासादायक असल्याने रिकव्हरी रेट ८०.२२ टक्के असा नोंदला गेला आहे. आजही २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात मंगळवारी २६६ जणांची आरटीपीसीआर टेस्ट, तर ७८९ जणांची रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात आरटीपीसीआर टेस्टमधील ३७ आणि रॅपिड अ‍ँटिजन टेस्टमधील १८० अशा एकूण २१७ जणांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली, तर जिल्ह्यात आणखी पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये लातूर येथील प्रकाशनगर, कोकाटेनगर आणि लातूर तालुक्यातील बोरी येथील प्रत्येकी एक , तसेच महात्मा फुलेनगर औसा व चाकूर तालुक्यातील नांदगाव येथील रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४७६ वर गेला आहे.

२२०८ रुग्णांची लक्षणे सौम्य
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या २ हजार ८४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे तब्बल २ हजार २०८ रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. तसेच २४९ जणांची लक्षणे मध्यम असली तरी त्यांना आॅक्सिजनची गरज नाही. याशिवाय ३२८ जण आॅक्सिजनवर, तर ६२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर १३३ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

संजय राऊत यांना कोर्टाने फटकारलं : ….ही बोलण्याची पद्धत आहे का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या