32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home लातूर शेतक-यांच्या जीवनात क्रांती घडविणारा आणखी एक प्रकल्प

शेतक-यांच्या जीवनात क्रांती घडविणारा आणखी एक प्रकल्प

एकमत ऑनलाईन

लातूर : शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेच्या जीवनात आर्थिक परीवर्तन घडवून लातूर आणि परीसराचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या मांजरा परीवारात टवेंिन्टवन शुगर्स ली. च्या रुपाने नव्या प्रकल्पाची भर पडली आहे. त्यामुळे या विकास प्रक्रीयेला आणखीन गती मिळणार असल्याचे प्रतिपादन, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.

साखर उद्योगातील सर्वांत अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन लातूर नजीकच्या मळवटी येथे उभारण्यात आलेल्या टवेन्ंिटवन शुगर्स ली. च्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दि. २१ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होते.

कोवीड-१९ प्रादूर्भावाच्या अनुषंगाने अत्यंत छोटेखानी आणि कौटोबीक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास विलास कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, मनपा विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दीपक सूळ, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचेअरमन गणपतराव बाजुळगे, टवेन्ंिटवन शुगर्स ली. चे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांच्यासह सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की, मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी विकासरत्न विलासराव देशमुख यांनी दूरदृष्टी ठेऊन ३६ वर्षापूर्वी लातूर परीसरात मांजरा कारखान्याची उभारणी केली. कारखान्याची उभारणी ज्या उद्देशाने केली होती तो उद्देश साध्य करण्याचे कार्य आजही सुरु आहे. या कारखान्याचा परिवार वाढत गेला असून आज परिवारातील आठव्या प्रकल्पाचा शुभारंभ आपण करीत आहोत. जिल्हा बॅक आणि या साखर कारखान्याच्या संयुक्त प्रयत्नातुन जिल्ह्याचा कायापालट झाला आहे, असे असले तरी हे काम आपणाला सुरुच ठेवायचे आहे. काळानुरुप होत असलेल्या बदलाची नोंद घेवून जनतेला अपेक्षित असलेला विकास आपणाला घडवायचा आहे. मांजरा परिवार आणि देशमुख परिवार हा काही वेगळा नाही. या परिवरातील प्रत्येक सदस्यांने परीसराच्या विकासासाठी योगदान देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगीतले.

ऊसाचे एकरी ऊत्पादन वाढवावे
टवेन्ंिटवन साखर कारखान्याचे गाळप सुरु झाल्यामुळे आता या भागातील एकाही शेतक-यांचा ऊस आता गाळपा शिवाय शिल्लक राहणार नाही, असे सांगून शेतक-यांनी ऊसाचे एकरी उत्पादन वाढवाला हवे असे आवाहन त्यांनी केले. यासाठी शेतक-यांना जिल्हा बॅक व कारखान्या मार्फत तांत्रीक व आर्थिक सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिले. या कार्यक्रम प्रसंगी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनी चाचणी गळीत हंगाम वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चाचणी गळीत हंगाम कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, धनंजय देशमुख, संभाजी सुळ, अभय साळुंके, अनंतराव देशमुख, रविशंकर जाधव, संभाजी रेड्डी, रविंद्र काळे, शाम भोसले, आसिफ बागवान, सपना किसवे, इजॅक कंपनीचे अनुज गर्ग, सुभाष कल्याणी, अनिल महेंद्रकर, रघुनाथ मदने, तबरेज तांबोळी, मिलिंद पाटील, मळवटी सरपंच कलावती कदम, मुन्ना उफाडे, कैलास पाटील, जितेंद्र स्वामी, दगडुसाहेब पडिले, नागसेन कामेगावकर, स्वयंप्रभा पाटील, मोहन सुरवसे, अ‍ॅड. बाबा पठाण, तुषार भोईटे, तुषार कल्याणकर, पंडित कावळे यांच्यासह मांजरा, रेणा, विलास, जागृती, टवेन्ंिटवन शुगरचे सभासद, अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे स्वागत व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जनरल मॅनेजर अशोक थोरात, नितीन मोरे, सागर मिसाळ, संजय तुरे पाटील, सुभाष कल्याणकर, अनिल मैदरकर, मिलींद पाटील, गोविंद देशमुख, प्रदिप सक्सेना, सतिश श्ािंदे, एरमन्नी, विपीन देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर व राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार टवेन्ंिटवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांनी मानले.

अष्टविनायक का प्रमाणे आठ कारखाने शेतक-यांची मंदिरे
टवेन्ंिटवन शुगर्स ली. कधी सूर होणार याची उत्सुकता संपली आहे. सामान्य जनतेच्या जीवनात चांगले दिवस आणणारा आठवा प्रकल्प आज लोकार्पण होत आहे याचा आपणाला मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे. देवाचे आशिर्वाद मिळावेत म्हणून लोक आष्टविनायकाची यात्रा करतात त्याच पध्दतीने जनतेच्या जीवनात सुख समृध्दी आणणारे मांजरा परिवारातील हे आठही साखर कारखाने मंदिराप्रमाणेच पवित्र आहेत. त्यामुळे ज्याचा नवीन उद्योग व्यवसाय उभारावयााचे आहेत. त्यांनी या आठ प्रकल्पाची यात्रा करायला हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊत्पादन खर्च कमी होणार शेतक-यांना अधिकचा लाभ मिळणार
जगातील सर्वांत अद्ययावत आणी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन टवेन्ंिटवन शुगर्स ली. उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पात अधिकाधीक कार्यक्षमतेचा वापर होईल, अधिकचा साखर ऊतारा मिळेल, त्यामूळे उत्पादन खर्च कमी होणार असल्याने त्याचा फायदा परीसरातील ऊसउत्पादक शेतकरी, शेतमजूर, वाहतुक ठेकेदारया सर्व घटकांना होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी प्रास्ताविकपर भाषणातून केले.

कारखाना उभारणी संदर्भाने माहिती देतांना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, प्रकल्प अद्ययावत असल्यामुळे कमीत कमी मनुष्यबळावर तो चालणार आहे. गाळप क्षमताही वाढणार आहे. या कारखान्यात उत्पादीत होणारी साखर गंधक विरहीत असल्यामुळे ती जास्तीत जास्त निर्यात होणार आहे. येथे कोजन प्रकल्पही उभारण्यात आला असून लवकरच इथेनॉल प्रकल्पाची उभारणी होणार आहे. अप्रत्यक्ष अधिकचा लाभ शेतक-यांनाच होणार आहे. गाळप क्षमता वाढल्यामुळे जिल्हा व परिसरातील बीगर सभासद ऊसउत्पादक सभासदांची अडचण दूर होणार आहे आहे, असे त्यांनी सांगीतले.

वडीलांचा दैवगुण, आईंचा पायगुण आणि काकाचा हातगुण
मांजरा परीवारातील हा आठवा प्रकल्प जनतेच्या हित साधण्यासाठी आज प्रत्यक्ष सुरु होत असल्या बद्दल आपणाला मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून वडीलांचा दैवगुण, आईंचा पायगुण आणि काकाचा हातगुण यामुळे या परिवारातील सर्व प्रकल्प यशस्वीपणे चालत असून त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे. जनतेचे आशीर्वाद हीच आपली शक्ती असुन त्या माध्यमातून जनसेवेचे व्रत्त आपण स्विाकरले असल्याचे सांगून चूकूनही आपल्या हातून चुक घडणार नाही याची दक्षता आपण सातत्याने घेत असतो असे नम्रपणे पालकमंत्री देशमुख यांनी सांगीतले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी राज्य सहकारी बॅक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय केल्या बददल तसेच प्रकल्प उभारणीत अहोरात्र परिश्रम घेणा-या अधिकारी, कर्मचारी यांचे मनस्वी आभार मानले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या