25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरतंबाखुविरोधीदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा

तंबाखुविरोधीदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडुन ऑनलाईन पद्धतीने तंबाखू विरोधी दिनानिमित्य चित्रकला /पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे आँनलाईन निकाल जिल्हा प्रकल्प (सलाम मुबंई फौऊंडेशन) समन्वयक शुभांगी लाड यांच्या हस्ते घोषित करण्यात आला आहे.

तंबाखूचे दूष्परिणाम या जनजागृतीपर पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रकला स्पर्धेत १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला. लहान मुलांंचे हे जनजागृतीपर बोलके चित्र कौतुकास्पद आहेत असे मत महादेव खळुरे यांनी व्यक्त केले स्पर्धा नि:शुल्क होती. या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई- सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा दोन गटात होती. लहान गटातून प्रथम-आयुष्य विजय चव्हाण सातारा, द्वितीय-कु.धनश्री भगवान हाके नांदेड,तृतीय-श्रेयस दिलीप धामणे ंिहगोली तर मोठा गटातून प्रथम-कु.प्रियंका काशिराम कवळकर वाशिम,द्वितीय-कु.दिव्या दीपक लहानकर वाशिम,कु.नंदिनी शंकर वानखेडे वाशिम,तृतीय-विश्व रवीद्र वाकळे औरंगाबाद, कु.प्रिती अनिल व्हटकर सोलापूर
तर उत्तेजनार्थ-कु.मुक्ता संतोष वानखेडे, कु.रोशनी वसंता खंडारे या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पेद्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी किरण खमितकर, सलिम आतार, बस्वेश्वर थोटे, अविनाश धडे, पद्मा कळसकर, मल्लिकार्जून खळुरे आदींचे सहकार्य लाभले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या