देवणी : तालुक्यातील प्रा आरोग्य केंद्र बोरोळ येथे दि.१२ रोजी ५० जणांची अँटीजेन रॅपीड टेस्ट घेण्यात आली. यात सर्व लोकांचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग कलंबरकर यांनी सांगितल्याने बोरोळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बोरोळ येथे दि.८ रोजी दोन कोरोना पॉझीटीव्हपैकी एका रूग्णाचा दि.११ रोजी मृत्यू झाल्याने बोरोळकरांच्याचिंतेत वाढ झाली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग कलंबरकर यांचे ंिद २२ मार्च २०२० पासून परिश्रम घेतले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल ददापूरे, ग्रामविकास अधिकारी राजेश मेनकुदळे, व्ही. एस. सकनूरे, गंगाधर माहोरे यांनी ५० जणांचा स्वॅब तपासणी केली असता सर्व रूग्णांंचा अहवाल निगेटीव्ह आल्याने बोरोळकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सीना-कोळेगाव धरणात पाणी