27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeलातूररेणापूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती

रेणापूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती

एकमत ऑनलाईन

रेणापूर २८ तर शिरूर अनंतपाळ २७ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त 

रेणापूर : रेणापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या २८ ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी प्रशासक नियुक्त केले आहेत. यात माहे जुलै २०२० ते डिसेबर २०२० या कालावधीत संपुष्टात येत आहेत व ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नैसर्गिक आपत्तीकिंवा आणीबाणीकिंवा युध्द, वित्तीय आणीबाणीकिंवा प्रशासकीय आडचणीकिंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार घेता येणे शक्य नाही अशी परिस्थिती शक्या नाही.

संदर्भीय आदेशान्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी रेणापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले आहेत. यात विस्तार अधिकारी जी.एस.काळे यांची आनंदवाडी,आंदलगाव, दिवेगाव, गव्हाण,खलंग्री, कुंभारी, मुसळेवाडी,व्हटी या ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. कृषी अधिकारी(पंचायत) ए.के.डमाळे यांची भंडारवाडी, माकेगाव, मोहगाव, पाथरवाडी, सारोळा, वाला येथे तर विस्तार अधिकारी एन.बी.कुमठेकर यांची बिटरगाव, फरदपूर,फावडेवाडी,खानापूर,खरोळा,ंिसधगाव तर शाखा अभियंता डि.ए.जाधव यांची बावची,कुंभारवाडी,तत्तापुर या ग्रामपंचायतवर तर शाखा अभियंता एस.जी कुलकर्णी यांची दवनगाव, मोरवड, पळशी तर विस्तार अधिकारी पोले यांची तळणी तर के.एस.जाधव यांची वंजारवाडी ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी नियुक्ती केली आहे

शिरूर अनंतपाळ : अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामविकास विभागाच्या प्राप्त अधिकाराचा वापर करुन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यात आले असून प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी गावगाड्याचा कारभार पाहणार आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले होते.

यानुसार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीवर बुधवारी दि. १२ ऑगष्ट रोजी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूमुळे उद्भवणा-या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.

प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या विस्तार अधिका-यांत सय्यद अंकुलगा साळुंकेके.बी, भिंगोली बळवंते एस.एल.,बिबराळ बळवंते एस.एल., बोळेगाव बु.व्होट्टे डी.बी.,चांमरगा मंडावले व्ही.एस., धामणगाव पौळकर पी.एस., डिगोळ तांदळे एस.बी., डोंगरगाव बोरी आडे एस.बी.,हालकी बळवंते एस.एल., हिप्पळगाव साळूंके के.बी., होनमाळ माने एम.एम.,जोगाळा सूर्यवंशी जी.एल., कळमगाव माने एम.एम.,कांबळगा आडे एस.बी.,कानेगाव भिसे बी.एम., कारेवाडी पौळकर पी.एस.,लक्कड जवळगा सुंदर आर.बी., साकोळ भिसे बी.एम., सांगवी घुगी मंडावले व्ही.एस.,शेंद घोटे डी.बी., शिवपूर सुंदर आर.बी.,सुमठाणा तांदळे एस.बी., तळेगाव देवणी आडे एस.बी., थेरगाव सुर्यवंशी जी.एल.,तिपराळ भिसे बी.एम., येरोळ व्होट्टे डी.बी., उमरदरा सूर्यवंशी जी.एल. या विस्तार अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गौर येथील मयत महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या