रेणापूर : कोरोना माहामारीमुळे शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुसकान होऊ नये म्हणून रेणापूर तालुक्यातील कोविडबद्दल जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या १०९ शाळापैकी १०९ शाळेत कोविड कॅप्टनची नियुक्ती करण्यात आली असल्याचे गटशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी दिली.
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुसकान होऊनये. तसेच कोविडबद्दल जनजागृती करण्यासाठी वर्गातील मुलांची कोविड कॅप्टन म्हणून नियुक्ती करावी व त्या गटाची पालकत्व समप्रमाणात शिक्षकांना देण्यात यावा अशी संकल्पना मांडली.
त्यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा परिषद लातूर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार व गटशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर तालुक्यातील १०९ जि.प शाळेत कोवीड कॅप्टन नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आॅनलाईन शिक्षणाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी वंदना फुटाने यांनी दिली.
Read More मोहा येथील अनैतिक संबंध खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप