24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूर२७ ग्रामपंचायतींसाठी दहा अधिकारी नियुक्ती

२७ ग्रामपंचायतींसाठी दहा अधिकारी नियुक्ती

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील हातनूर रावणकोळा बेळसांगवी ,कुणकी, लाळी बु ,बोरगाव, एकुरका ,तिरुका ,घोनसी ,ंिचचोली, मेवापूर, धामणगाव, शेलदरा, विराळ, वडगाव, वांजरवाडा, शिवाजीनगर तांडा, सुल्लाळी, डोंगरगाव, येलदरा ,गव्हाण ,हळदवाढवणा , मरसांगवी ,कोळूनुर, पाटोदा खू, डोंगर कोनाळी ,सोनवळा, या सत्तावीस ग्रामपंचायतींच्या मुदती जुलै महिन्याच्या अखेरीस संपलेल्या आहेत. शासनाने या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून आपल्या या पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचे ठरवले होते परंतु काही सरपंच संघटना तसेच पक्षाचे पदाधिकारी यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती यामुळे न्यायालयात ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी एखाद्या खाजगी व्यक्तीची निवड न करता प्रशासनामधील अधिका-यांची ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी नियुक्ती करावी असे आदेश दिले होते. यामुळे आता जळकोट तालुक्यातील या २७ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून अधिकार यांची वर्णी लागली आहे.

जळकोट तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या नावापुढे ग्रामपंचायतीची नावे देण्यात आली आहेत. गिरी एच. जी.-(आतनूर, रावणकोळा), गोलंदाज आ.जे -(बेळसांगवी,कुणकी,लाळी), तमलवाड एस. आर. (बोरगाव, एकुरका ,तिरुका, घोनसी), हंडे व्ही. के.- (चिंचोली ,मेवापूर ), दयानंद घंटेवाड – (धामणगाव,शेलदरा,विराळ ,वडगाव,वांजरवाडा), गर्जे एस पी- ( शिवाजीनगर तांडा,सुल्लाळी) , उस्ताद ए झेड- (डोंगरगाव, येलदरा) , त्रीपती जी ए- (गव्हाण ,हळदवाढवणा ,मरसांगवी), मठपती जीके- (कोळनुर, पाटोदा (खु), भोसले .डी एम-( कोनाळी, सोनवळा), या अधिका-यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यातील काही अधिका-यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यकर्त्यांचा झाला हिरमोड
जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीवर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सरपंच म्हणून वर्णी लागणार होती, गावामध्ये याची तयारी करण्यात आली होती जवळपास कोणत्या ग्रामपंचायतीवर कोणत्या कार्यकर्त्यांची वर्णी लावायची हे निश्चीत झाले होते, यासाठी विविध बैठकाही झाल्या होत्या. यामुळे काही दिवसात या कार्यकर्त्यांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्णी लागणार होती परंतु उच्च न्यायालयाने प्रशासकपदी अधिका-याची नेमणूक करावी असे आदेश दिल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

वैद्यकीय प्रवेशाचा ७०/३० चा फार्मूला रद्द करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या