22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूर४०१ कोटींच्या खर्चास मान्यता

४०१ कोटींच्या खर्चास मान्यता

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक घेऊन सन २०२१ – २२ मध्ये विकास कामावर झालेल्या रुपये ४०१ कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. मंजूर निधीचा शंभर टक्के खर्च करुन राज्यात लातूरचे वेगळेपण दाखवून दिल्याबद्दल सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व विभागनिहाय आढावा घेऊन आगामी वर्षात रुपये ४२९ कोटीचा निधी खर्च करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सन २०२२-२३ या वर्षासाठीची जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धिरज विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी म. शं. दुशिंग, जिल्हा नियोजन समितीचे मान्यवर सदस्य यांच्यासह विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. मत्स्य व्यवसाय विभागाने ज्या ठिकाणी पाणी साठे आहेत, त्या ठिकाणी मासेमारी होतेकिंवा कसे याबाबत माहिती घ्यावी, यातून जिल्ह्याला चांगला महसूल मिळेल आणि रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याने मत्स्य विभागाने जिल्ह्यात सकारात्मक दृष्टिने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिले. नियमितपणे कर्ज फेडणा-या जिल्ह्यातील १ लाख ७५ शेतक-यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यानी यावेळी दिली.

जिल्ह्यात गाव तेथे स्मशानभूमी उपक्रम राबविण्यात येणार
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यात ज्या ठिकाणी दफन व दहन भूमी नाहीत अशा ठिकाणांची परिपूर्ण यादी तयार करावी. यासाठी वेगळ्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधावेत अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी शिक्षणाधिकारी यांना दिल्या. कौशल्य विकास विभागाने प्रत्येक तालुक्यातील आय टी आय च्या क्षमतेची माहिती घेऊन लातूर जिल्ह्यातील नौकरीसाठी लागलेले विद्यार्थी आहेत, यासह महाराष्ट्रातील आकडेवारीची टिप्पणी स्वरूपात माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करावे. आमदार महोदयांनी त्याबाबतचा आढावा घ्यावा अशा सूचना दिल्या.

जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या विकासासाठी पाठपुरावा करणार
जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या इमारती, कर्मचारी वेतन, पुस्तक खरेदी निधी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत: आपण पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले. तसेच एमपीएससी, यूपीएससी प्रशिक्षण देण्यासाठी रूपरेषा निश्चित करावे. आर्मी भरती, एअरफोर्स, रेल्वे भरती अशा विविध परीक्षेचे प्रशिक्षण देण्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक अशा आय. ए .एस., आय. पी. एस. अधिका-यांशी चर्चा करून स्पर्धा परीक्षा केंद्राचा वेगळा लातूर पॅटर्न होईल असा प्रयत्न करावा असे निर्देश जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना दिले. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी अद्ययावत क्रीडा संकूलाचा अराखडा तयार करावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांन यावेळी दिल्या.

तांडा वस्ती विकास योजनेतर्गत जिल्ह्यातील सर्व तांडा वस्तीमध्ये पिण्यासाठी पाणी, लाईट व जोडरस्ता आवश्यक गरजा पाहता सामाजिक न्याय विभागाने त्याचा आराखडा व प्रस्ताव राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे व माझ्याकडे प्रस्ताव द्यावा, त्याचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील अर्धवट राहिलेली कामे प्रलंबित आहेत त्याची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पाहणी करून सूची तयार करावी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे अपूर्ण राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत असे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले. अनुसूचित जाती उपयोजनेतर्गतचा निधीतून जे रस्त्याचे कामे होतात ते गुणवत्ता पूर्ण होतात का त्याची गुणवत्ता तपासणी त्रयस्थ संस्थे मार्फत
करण्याचे निर्देशही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिले. \

जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि सार्वजनिक ठिकाणी जिथे, जिथे तलाव आहेत त्या ठिकाणी पोहण्यासाठी जाऊन दुर्दैवी घटना घडत आहे. त्याठिकाणी तात्काळ पोहण्यास बंदी असल्याचे सूचना फलक लघु पाटबंधारे विभागाकडून तात्काळ लावावेत अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील आमदार धिरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार यांनी विकास कामाबाबत सूचना केल्या. त्यांच्या सूचना मान्य करुन त्यावर योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या