30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरप्रशासनाच्या निर्देशानुसार विर्सजनही गर्दी टाळत शांततेत करावे : पालकमंत्री अमित देशमुख

प्रशासनाच्या निर्देशानुसार विर्सजनही गर्दी टाळत शांततेत करावे : पालकमंत्री अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

श्री गणेशोत्सव काळात लातूरकरांनी निभावलेली भूमिका प्रशंसनीय

लातूर : कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी श्री गणेशोत्सव काळात लातूरकरांनी अत्यंत चांगली भूमिका घेत लातूरचे वेगळेपण दाखवून दिले आहे. अजा दि. १ सप्टेंबर रोजी होणारे विसर्जनही घरीच किंवा गर्दी न करता प्रशासनाच्या निर्देशानुसार शांततेने करावे, जिल्ह्यातील जनतेने रस्त्यावर किंवा कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

यावर्षी कोविड-१९ चे संकट लक्षात घेता श्री गणेशोत्सव संदर्भाने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, लातूर शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशाची स्थापना न करण्याचा निर्णय उस्फूर्तपणे घेतला आहे. काही ठिकाणी मंदिरात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असली तरी त्यास सार्वजनिक स्वरूप येऊ न देण्याची काळजी गणेश भक्तांनी घेतली आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठीही अनेक गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

या काळात जमा असलेल्या निधीतून काही गणेश मंडळांनी सॅनिटायझर आणि मास्क वाटप तसेच वृक्षारोपण, स्वच्छता असे उपक्रम घेतले आहेत ही अतिशय आनंदाची आणी प्रशंसनीय बाब आहे. यातून लातूरचे वेगळेपण पुन्हा एकदा उठून दिसले आहे अशी भावना व्यक्त करून या सामाजिक उपक्रमाबद्दल सहभागी गणेश मंडळाचे पालकमंत्री या नात्याने ना. देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

आज श्री गणेश विसर्जन होणार असून या दिवशीही लातूर जिल्ह्यातील जनता आणि गणेशभक्त योग्य भूमिका घेतील हा विश्वास आहे, रस्त्यावर किंवा विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतील, अशी अपेक्षा आहे. विसर्जनाच्या दिवशी कोणीही मिरवणूक काढू नये असे प्रशासनाने सूचवलेले आहे, त्यामुळे सर्वांनी श्री गणेशाचे विसर्जन घरीच करावे.

ज्यांना हे विसर्जन घरी करणे शक्य नाही त्यांच्यासाठी लातूर महानगरपालिकेने प्रभागनिहाय संकलन केंद्र स्थापन केलेली आहेत, त्या संकलन केंद्रावर आपल्या कडील मूर्ती आपण स्वत: किंवा गणेश मंडळाच्या माध्यमातून पोहोचवाव्यात, महापालिकेच्या वतीने त्या मूर्तीचे विधीवत विर्सजन करण्यात येणार आहे असे नमूद करुन श्रीगणेश विर्सजनाच्या संदर्भाने प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे लातूर जिल्ह्यातील जनता व गणेशभक्तांनी पालन करावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

उस्मानाबाद: पोलीस पाटील यांना ५० लाखाचे विमा कवच द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या