28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरअश्वगंधा वनस्पती शेतक-यांना हमखास उत्पन्न देणारी शेती

अश्वगंधा वनस्पती शेतक-यांना हमखास उत्पन्न देणारी शेती

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अश्वगंधा ही आर्युवेदीक वनस्पती असून कोरोना पश्चयातच्या जगात औषधी उपयोगासाठी या वनस्पतीची मोठी मागणी वाढली आहे. अश्वगंधा वनस्पतीची लागवड केल्यास शेतक-यांना हमखास उत्पन्न मिळू शकते, असे ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

लातूर तालुक्यातील शेतक-यांना पारंपरीक पिकांसोबत सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि., ने आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या सोबत पुढाकार घेऊन राबविली आहे. या अश्वगंधा काढणीचा हंगाम सुरु असून हरंगूळ (बु), महापूर, महाराणा प्रतापनगर येथे जाऊन ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि.,च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी पाहणी केली. अश्वगंधा वनस्पती लागवड ते काढणी बाबतचे शेतक-यांचे अनुभव चर्चा करुन जाणून घेतले. या योजनेत लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, मळवटी, महापूर, हरंगुळ बु., हरंगुळ खु., चिखुर्डा, आखरवाई, गातेगाव, मांजरी, सारोळा, कव्हा, जमालपूर येथील शेतक-यांनी सहभाग घेतला होता. ट्वेन्टीवन अ‍ॅग्री ली., चे अधिकारी व कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीचे तज्ज्ञ यांनी अश्वगंधा प्रक्षेत्रावर भेटी देऊन शेतक-यांना मार्गदर्शन केले होते.

सद्या अश्वगंधा काढणीचा हंगाम सुरु असून हरंगूळ (ब.) येथील ओम गोपे व शिवशंकर पाटील यांच्या शेतात, महापूर येथील भगवान भादर्गे यांच्या शेतात तर महाराणा प्रताप नगर येथील अ‍ॅड. विकास सूळ यांच्या शेतात जाऊन ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी काढणी व काढणी पश्चातच्या वनस्पतीची पाहणी केली. या सर्व शेतक-यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांच्याशी चर्चा करतांना लातूर जिल्ह्यातील भागोलीक परिस्थिती, वातावरण अश्वगंधा लागवडीसह औषधी वनस्पतीच्या लागवडीस अनुकूल आहे.

याचाच विचार करून ट्वेन्टीवन अ‍ॅग्रीली.च्या माध्यमातून लातूर तालुक्यातील शेतक-यांसाठी अश्वागंधा लागवड योजना राबविण्यात आली. हमखास उत्पादन देणारी येथील शेतक-यांसाठी राबविलेली वनसपती लागवड योजना यशस्वी झाली असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी ट्वेन्टीवन अ‍ॅग्री लि.,चे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संगिता मोळवणे, धनंजय राऊत, अविनाश देशमुख, पंडितराव ढमाले आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या