23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरकाशिलिंगेश्वर नगराच्या मुख्य रस्त्याचे लवकरच डांबरीकरण

काशिलिंगेश्वर नगराच्या मुख्य रस्त्याचे लवकरच डांबरीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
काशिलिंगेश्वर नगर गावचा मुख्य रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल असे आश्वासन माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या भागातील नागरीकांना दिले. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल काकाज ग्रुप लातूरचे अध्यक्ष विजयकुमार धुमाळ, उद्योजक अनिल चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते अमित विलासराव देशमुख यांचे स्वागत करुन आभार मानण्यात आले.

काशिलिंगेश्वर नगर गावचा मुख्य रस्ता हा काकाज ग्रुप लातूरचे अध्यक्ष विजयकुमार धुमाळ यांच्या पुढाकारातून व या भागातील नागरिकांच्या सहकार्याने अंबाजोगाई रोडवरुन काशिंिलगेश्वर देवस्थानाकडे जाणारा रस्ता हा १० फुटाचा होता. तो ३० फुटाचा करताना शहर जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी पालकमंत्र्यांच्या निधीतून डांबरीकरण रस्ता करण्याचे जाहीर केले होते. आज माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या निधीतून व अ‍ॅड. किरण जाधव यांच्या शिफारशीनुसार तसेच शहर जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार धुमाळ यांच्या प्रयत्नातून आज हा प्रश्न मार्गी लागला असुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल असे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज या भागातील नागरिकांना आश्वासीत केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या