24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरगोगलगायीमुंळे पीक नुकसानीची मदत द्यावी

गोगलगायीमुंळे पीक नुकसानीची मदत द्यावी

एकमत ऑनलाईन

औसा : गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांंना मदत देण्याचा शासकीय आदेश लवकर काढावा .याचबरोबर संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनाही मदत देण्यात यावी. व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आधार घेऊन लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप २०२० चा पिकविमा कंपनीला वितरित करण्यात विमा कंपनीला भाग पाडावे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या चर्चेत गोगलगाय संदर्भात शासकीय आदेश आठ-दहा दिवसात निर्गमित करण्याचा शब्द उपमुख्यमंत्र्यानी दिला आहे.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औसा तालुक्यातील बाधीत क्षेत्राची पाहणी करून सदरील माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. तसेच विधीमंडळात याबाबत शेतक-यांना मदतीची घोषणा केली होती. सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत वितरित करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित केले असून याबद्दल आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. लातूर – उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याचे बावीस हजावर सभासद असून हा कारखाना हा कारखाना सुरू होणे आवश्यक आहे.यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या