21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरमसलगा येथे महामार्गावर ‘छावा’ चा रास्ता रोको

मसलगा येथे महामार्गावर ‘छावा’ चा रास्ता रोको

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील मसलगा पाटीवर महामार्गाचे अर्धवट काम, शेतक-यांचे जमिनीचे संपादन, गोगलगायीचे संकट, पूरस्थितीसह शेतक-यांना भेडसावणा-या विविध प्रश्नांना वाच्या फोडण्यासाठी वेळोवेळी छावा संघटनेने लेखी निवेदन देऊनही शासन दरबारी नुसते आश्वासन मिळत असल्याने दि. १० ऑगस्ट रोजी छावा संघटनेच्या वतीने शेतक-यांसह बैलगाडी घेऊन लातूर-जहीराबाद महामार्गावर छावा संघटनेचे पदाधिकारी व शेतक-यांंनी रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी लातूर जहीराबाद महामार्गाचे काम मसलगा पुलालगत अर्धवट केल्यामुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले असून या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे. तसेच हायवेलगत बसथांब्याचे काम पूर्ण करावे, पथदिवे लावावे, गोगलगाईने शेतक-यांची पिके फस्त केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्वरीत हेक्टरी ७५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच सोळ नाला व मांजरा नदी काठाच्या सर्व जमीनी कायम बाधीत म्हणून घोषित करण्यात याव्यात तसेच मसलगा गावातील एकही बसेसची फेरी कुठलेही कारण न सांगता बंद करण्यात येऊ नये आदी मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

छावा संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांच्या नेतृत्वाखाल हे आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर ंिपड, गुरूनाथ जाधव, बापुराव जाधव, गणी शेख, बाबासाहेब पाटील, मोहन ंिपड, दत्ता ंिपड, दिलीप जाधव, श्रीमंत पाटील, सतीश जाधव, विशाल पाटील, विजय चामे, व्यंकट शेळके, पंकज शेळके, बबन आरेराव, गोपाळ सलघंटे, दत्ता शिंदे, महमद सय्यद, हारून शेख, मलकु लव्हरे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या