लातूर : येथील ऋषभ महावीर पोकर्णा हा पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाला तो अवघा २१ वर्षाचा असून सीपीटी, इंटर मिजीएट, फायनल असे ग्रुप तो एकाच प्रयत्नात उत्तीर्र्ण झाला. २१ व्या वर्षात सीए होणारा लातूर जैन समाजातील ऋषभ हा एकमेव सीए आहे.
त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सद्गुरू जीवराज भवन येथे त्याचा जैन संत पू. विजयमूनि म. सा. ,पू भूषणमुनि म. सा. यांच्या सानिध्यात जैन श्रावक संघातर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी ऋषभची आजी, वडील, आई यांचाही सन्मान करण्यात आला. ऋषभच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सूमतीलाल छाजेड, सचिव रवींद्र दर्डा, गुरू गणेश ग्रंथालयाचे अध्यक्ष पुखराज दर्डा, सचिव राजेश डुंगरवाल व जैन समाजाने अभिनंदन केले आहे.