23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरमहापालिकेची शेवटी विशेष सभा खेळीमेळीत

महापालिकेची शेवटी विशेष सभा खेळीमेळीत

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेची द्वितीय सार्वत्रिक निवडणुक २०१७ मध्ये झाली होती. आज दि. २१ मे रोजी महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपत आहे. तत्पुर्वी दि. २० मे रोजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात महानगरपालिकेची शेवटची विशेष सभा झाली. ही सभा रात्री उशिरापर्यंत चालली. खेळीमेळीत झालेल्या या सभेत विषय पत्रिकेवरील विविध २० विषयांवर चर्चा करण्यात आली. महापौर, उपमहापौर आणि सर्वच नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळाविषयी मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले. मात्र सभागृहाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानंतरही मनपा प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली नसल्याबद्दल सभागृहाने प्रशासनावर नाराजीही व्यक्त केली.

या विशेष सभेत गुंठेवारी आणि घन कचरा व्यवस्थापन हे दोन विषय कळीचे ठरले. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या सभेत गुंठेवारीचा ठराव सभागृहाने घेतला परंतू, गेल्या २-३ महिन्यांत महापालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमतलबजावणीच केली नाही. त्यामुळे सध्या १९७ प्रस्ताव प्रलंबीत आहेत. शिवाय नागरिकांचा सर्व रोष हा नगरसेवकांवरच राहिल्याचे या सभेत सांगण्यात आले. शिवाय घन कचरा व्यवस्थापनाचा ठेका ज्या जनाधार सेवाभावी संस्थेला देण्यात आला होता. त्या संस्थेने मनपा प्रशासनाच्या मदतीने ‘रॅपिड्यु’ या कंपनीशी परसरपर करारा केला. या करारा वर एकाही लोकप्रतिनीधींची स्वाक्षरी नाही. हा ठराव कसा झाला, कोण केला, या विषयीही चर्चा झाली.

पाणी पुरवठा, बांधमकाम परवाना, शहरातील ऑटोरिक्षा थांब्यावर चार्जिंग स्टेशन, दलीत वस्तीमधील समाज मंदीरांचे बांधकामासाठी निधी मिळणे, लातूर शहर परिवहन बस सेवेमध्ये महिलांना दिलेल्या मोफत प्रवासाचा मोबदला संबंधीत अभिकर्त्यास प्रदान करणे, निधी विनियोग, मनपाच्या वतीने मराठवाडा मुक्ती अमृत महोत्सव वर्ष साजरे करणे, मनपा शाळांना सुट्यांच्या दिवसांत विवाह व इतर कार्यक्रमासाठी भाड्याने देणे आदी विषयांवार चर्चा करण्यात आली. या चर्चेत महापौरांसह सर्वच नगरसेवकांनी सहभाग घेतला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या