चाकूर : तालुक्यातील मौजे आटोळा येथील सार्वजनिक विहीरीवरील रोहीञासाठी जल्हिा नियोजन समितीची मान्यंता मिळून ही,त्यास प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने आटोळा ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.या त्रासापासुन मुक्तता मिळवण्यासाठी आटोळा ग्रामस्थांचे तहसील समोर उपोषण सुरू केले आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार चाकूर यांना दिले आहे. सदर निवेदनात असे नमूद केले आहे की, या गावाला सतरा खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जात होता. माञ गेल्या दोन वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे. त्यामुळे आटोळा ग्रामस्थांचे पाण्यासाठी बेहाल होत आहेत.गेल्या दोन वर्षांपासून सरपंच रेणुका तोडकरी आणि पंचायत समिती सदस्य महेश वत्ते यांच्या नेतृत्त्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र त्यास यश आले नाही.दरम्यान सरपंच तोडकरी यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सार्वजनिक विहिरीचे काम केले,
त्या विहीरीस चांगले पाणी लागले आहे. याच विहीरीचे पाणी आटोळा ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजने अंतर्गत देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे रोहीञाच्या मंजुरीसाठी ग्रामपंचायतीने पञ पाठविले.यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली.माञ रोहिञासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली नाही.त्यामुळे काम रखडले, अखेर पंचायत समिती सदस्य महेश वत्ते, सरपंच रेणुका तोडकरी, महादेव कलवले, संग्राम शेळके,बालीका कलवले, सचिन शेळके,रूकीयाबी दरोगे, युनूस शेख, नागनाथ गंगापुरे आदी सह ग्रामस्थ उपोषणाला बसले होते.