24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरपत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न

पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

उदगीर : पती-पत्नीमधील किरकोळ वादावरून चक्क पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उदगीर तालुक्यातील हेर येथे घडली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीर तालुक्यातील हेर येथील पीडित महिला फरजाना शादुल शेख यांचा पती शादुल शेख याचे इतर दुस-या महिले सोबत संबंध आहेत. तसेच तो सतत दारू पितो. लग्न झाल्यापासून तो पीडित विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. दि. ८ जून रोजी फिर्यादीने सकाळी आठ वाजता स्वयपाक करून पतीला जेवणाची विनंती केली. मात्र पती न जेवता तो घरातून बाहेर निघून गेला. त्यानंतर तो चक्क रात्री साडेनऊ वाजता घरी आला.

घरी आला त्यावेळी तो दारू पिलेल्या अवस्थेत होता. त्याने जेवनासाठी सकाळी केलेली वांग्याची भाजी जेवायला दे असे पत्नीला सांगितले. मात्र सकाळी केलेली भाजी संपल्यामुळे पत्नीने भाजी संपली असे सांगितल्यानंतर, मला तीच भाजी हवी आहे, असे म्हणून त्याने शिवीगाळ करून वाद घालायला सुरुवात केली.या वादाच्या रागातच चुली जवळ ठेवलेल्या रॉकेलच्या बाटली मधील रॉकेल पत्नीच्या अंगावर टाकले, आणि काडी ओढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पीडित महिला ही २५ टक्के भाजली असून शेजा-यांनी आरडाओरडा ऐकून धावत येऊन आग विझवली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी डेनियल जॉन बेन, ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील घोडके हे अधिक तपास करत आहेत.

केवळ भाजीच्या कारणावरून पत्नीस जिवे मारण्याच्या उद्देशाने रॉकेल टाकून पेटवून दिल्यामुळे हेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंचवीस टक्के भाजलेल्या महिलेस लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी शादुल शेख यास उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

अत्रेसाहेबांसोबतची १२ वर्षे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या