27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरऔसा बाजार समिती लातूर जिल्ह्यात तिस-या स्थानी

औसा बाजार समिती लातूर जिल्ह्यात तिस-या स्थानी

एकमत ऑनलाईन

औसा : जागतिक बँक अर्थसहाय्यीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्र्िरसद्ध झाली आहे. त्यात औसा बाजार समितीला जिल्ह्यातील १० बाजार समितींपैकी तिसरा क्रमांक मिळाल्याची माहिती बाजार समितीचे प्र सचिव संतोष हुच्चे यांनी दिली.

बाजार समितीने शेतकरी बांधवांसाठी व माल विक्रीसाठी बाजार आवारात उभारणी केलेल्या पायाभूत सुविधा, निकषांप्रमाणे आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज व इतर सुविधांच्या गुणांकाच्या आधारावर बाजार समित्यांची क्रमवारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाला जागतिक बँकेकडून आर्थिक सहकार्य करुन राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुधारणा घडवून शेतक-याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.त्याप्रमाणे औसा बाजार आहेत. त्याकामी बाळासाहेब ठाकरे समितीतील विविध सुविधांची पाहणी करुन ११२ गुण देण्यात आले असून, या क्रमवारीत औसा बाजार समिती राज्यात ६४ व्या लातूर विभागात १० व्या तर लातूर जिल्ह्यात तिस-या क्रमांकावर आहे. निकषांप्रमाणे तालुका उपनिबंधकांकडून तपासणी करुन बाजार समत्यिांना गुण देण्यात आले होते.

रँकिंगमुळे निर्णय घेण्यास सुकर होणार
बाजार समितीच्या विकासामध्ये शेतकरी, व्यापारी, कर्मचारी वृंद, तसेच औसा बाजार समितीत आजपर्यंत केलेल्या कामामुळे बाजार समितीस तिस-या क्रमांकावर असल्याची समाधानकारक बाब आहे. राज्यातील बाजार समितीच्या रॅंिकगमुळे शेतक-यांना बाजार समितीचे कामकाजाविषयी माहिती होवून शेतीमाल विक्रीबाबतचा निर्णय घेण्यास सुकर होणार आहे, असे सभापती राजेंद्र भोसले यांनी सांगितले

बाजार समितीस प्रोत्साहन मापारी, हमाल व अन्य बाजार घटकांचा समावेश आहे. भविष्यात बाजार समित्यांमार्फत शेतकरी हितासाठी व त्यांच्या शेतमालाला अधिकाधिक भाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून स्पर्धाक्षम बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती/ उभारणी होईल. त्याचबरोबर शेतकरी लाभाच्या आणखी योजना / उपक्रम राबविण्यासाठी सर्व बाजार समित्यांना प्रोत्साहन मिळेल. अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या