24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरऔसा तालुक्याने ओलांडली कोरोनाची शंभरी

औसा तालुक्याने ओलांडली कोरोनाची शंभरी

एकमत ऑनलाईन

औसा : औसा शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ११३ च्या वर गेली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे . शहरात एका वैद्यकिय अधिकारी व एका नायब तहसीलदारास कोरोनाची बाधा झाली आह़ तालुक्यातील ५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना कोव्हिड सेंटर मधून घरी पाठविले आहे. तर तपसे चिंचोली व फत्तेपूर येथील दोन वयोवृध्दांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे

सध्या औसा येथील कोव्हिड केअर सेंटर माध्ये १० पुरुष व १३ महिला असे एकूण २३ जणांवर उपचार चालू आहेत. तेथे ४ वैद्यकिय अधिकारी व चार आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. औसा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शहरातील अनेक भागात टवाळखोरांच्या झुंडी विना मास्क गप्पा मारत संध्याकाळी बसत आहेत . बेफिकीर तरुणाईतील मुले विना मास्क फिरताना दिसत आहेत पेठ , बुधोडा , या राष्ट्रीय महामार्गावरील गावात तर चौकात , रस्त्यावर लोक विना मास्क गप्पागोष्टीत दंग असतात अशीच अवस्था ग्रामीण भागात आहे. औसा शहरात विना मास्क वावरणाºया बाबत नगरपालिकेने दंडात्मक कारवाई बाबत कठोर भूमिका प्रशासनाने घेणे गरजेचे बनले आहे .यासाठी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात जनजागरण करणे आवश्यक आहे.

औसा शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि गल्ली बोळातील वावर थांबवण्यिासाठी आता नगर परिषदेच्या वतीने पेट्रोंिलग साठी २४ तास कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी दिली आहे .औसा नगरपालिकेची विशेष बैठक व्हिडीओ काँनफरन्सिगद्वारे घेण्यात आली.

या बैठकीत ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची थर्मामीटर व आॅक्सी मीटर द्वारे तपासणी करून ज्यांना त्रास होतो, अशा नागरिकांची नियमित तपासणी करणे, कोविड केअर सेंटरमध्ये नियमित सॅनिटायझर फवारणीचे व्यवस्था पालिका तर्फे करण्यात येणार असून ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येतील तो परिसर आरोग्य, महसूल आणि नगर परिषदेच्या कर्मचाºयांमार्फत सील करावे. असा ठराव घेण्यात आला आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सेंटर मध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करून आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करावा.

औसा टी पॉर्इंट पासून बस स्थानक पर्यंतच्या नालीतील गाळाचा उपसा करणे, किराणा व इतर व्यापारी आस्थापनासह बँंिकगच्या ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी नगर परिषद कर्मचारी नियुक्त करण्याचे करावेत . शहरातील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना नगर परिषदेमार्फत पाणी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वैद्यकीय सेवा संबंधितांच्या खर्चासह द्याव्यात असा ठराव मांडण्यात आला आहे.

नर्जिंतुकीकरण करण्यासाठी शहरात सोडियम हायड्रॉक्साईड ची फवारणी करावी, असेही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत ठरले असून आरोग्य सेतू अ‍ॅप नियमाचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि सर्व सभापती नगरसेवक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला

कोरोनाबाधित सहा रुग्ण उपचारानंतर घरी
देवणी : येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये मंगळवारी दि. २१ जुलैपर्यंत एकूण सहा रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बोरोळ येथील एक रुग्ण, वलांडी येथील दोन रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे तर २३ कोरणाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत तालुक्यातील दोन कोरना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या