लातूर : प्रतिनिधी
येथील बीएसएनलचे अभियंता हितेंद्र तिवारी यांना मुख्य महाप्रबंधक मंडल ऑफिस यांच्याकडून उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. स्पर्धेच्या या काळात शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये बीएसएनलची सेवा नागरीकांना मिळावी यासाठी बीएसएनल कडून देशातील सर्व राज्यांना सीम कार्ड विक्रीचे उद्दिष्ट दिले जाते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील बीएसएनलचे अधिकारी या दृष्टीने काम करत असतात. दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे काम केल्या बद्दल हितेंद्र तिवारी यांना पुरस्कार देण्यात आला.
हितेंद्र तिवारी यांनी ३० हजार सीम कार्डचे उद्दिष्ट असताना ६२ हजार सीम कार्ड वितरीत केले आहेत. बीएसएनलचे महत्व नागरीकांना सांगण्यासाठी विविध गावांमध्ये मेळावे आयोजित करून नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात नागरीकांनी बीएसएनलची सेवा घेतली आहे. महाराष्ट्र विभागात सर्वाधिक सीम कार्ड नागरीकांना वितरीत केले असल्याने हितेंद्र तिवारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
आहे.सदरील पुरस्कार नुकताच महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक रमाकांत शर्मा यांच्या हस्ते हितेंद्र तिवारी यांना प्रदान करण्यात आला.
हितेंद्र तिवारी यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल. साईनाथ लोमटे, सतिश पाटील, रंगनाथ चव्हाण, गणेश चव्हाण, सतीश वाकडे, विनायक अंधारे, व्यंकट कडने, सतीश सुवर्णकार, धनराज कांबळे, काकासाहेब जाधव, सचिन शिखरे, बाळू गवळी, नागेश गाथाडे, राजू सी. पाटील व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.