लातूर : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा बँकात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२१ चा अमीज पब्लिकेशन कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा उत्कृष्ठ डीपॉझिट ठेवी रक्कम २००१ कोटी ते ५००० कोटी ठेवीमधून देण्यात येणारा बँको ब्लू रिबोन प्रथम पुरस्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लोणावळा येथे बँक ऑफ इंडियाचे सेवा निवृत्त जनरल मॅनेजर डी. जी. काळे यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
यावेळी लातूर जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, संचालिका श्रीमती लक्ष्मताई भोसले, संचालिका सौ. सपना किसवे, संचालिका सौ. अनिता केंद्रे, बँकेचे प्रतिनिधि म्हणून विनोद शिंदे यांनी स्वीकारला. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बँकोचे चीप अशोक चिंत्रे, अशोक नाईक उपस्थित होते. दरम्यान लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस हा पुरस्कार मिळाल्याने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उत्कृष्ठ कार्याचा ठसा राज्यात नव्हे तर देशाच्या कोनाकोप-यात लातूर बँकेने उमटवला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३० वर्षांपासून कार्यरत असून बँकेने आतापर्यंत राज्य पातळीवरील २३, राज्य सरकार, देशपातळीवर असे एकूण ३४ पुरस्कार मिळवले आहेत लातूर बँकेस प्रशासनात पारदर्शकता, कोअर बँंिकग सेवा, उत्कृष्ट ठेवी, वसूली उच्चांक, ए. टी. एम. सेवा, संगणक सेवा, आर्थिक स्थिती, प्रशासकीय विभाग आदींचे पुरस्कार बँकेने पटकावलेले आहेत हे विशेष आहे.