22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरजाधव यांना जिल्हास्तरीय शाहू पुरस्कार प्रदान

जाधव यांना जिल्हास्तरीय शाहू पुरस्कार प्रदान

एकमत ऑनलाईन

निलंगा : शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि २६ जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून शाहू प्रतिष्ठान लातूरच्या वतीने दयानंद सभागृहात माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व विक्रम काळे यांच्या उपस्थितीत सामाजिक, राष्ट्रीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविल्याने जाधव एम. एम. प्राथमिक पदवीधर प्रा शा जेवरी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी जाधव यांना पंचायत्ह्या समितीचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, विलासराव देशमुख पुरस्कार, कोरोना योद्धा अशा अनेक पुरस्कारांनी त्याना गौरविण्यात आले आहे,

निर्मल ग्राम अभियान, स्वच्छता अभियान, शाहू, फुले, आंबेडकर व जिजाऊ सावित्री व्याख्यानमाला, रक्तदान, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा, क्रीडास्पर्धा, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या दफ्तर वाटप, नेत्रदान चळवळ, अवयवदान चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, कोरोना कालावधीत रुग्णांना मदत. या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. पुरस्काराबद्दल एम एम जाधव यांचे अमोल ताकभाते, गायकवाड एस. बी, तांबोळे एस. एस. ंिलंबराज सूर्यवंशी, रोहन जाधव, बाळकृष्ण तांबारे, शिवाजी साखरे, गुंडुरे डी बी, बरमदे डी. बी. जाधव ए. पी. मोरे अजय, डॉ शिंदे एस. एस. डॉ उद्धव जाधव, संतोष स्वामी, शिंंदे राजकुमार, पाटील उध्दव, विनोद सोमनवणे, बरमदे आर. एन. संदीप खमीटकर, धुमाळ डी. एस. आप्पाराव शिंंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या