23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरसहकार महर्षी दिलीपराव देशमुख, उल्हास पवार यांना संगीत रसिकाग्रणी पुरस्कार प्रदान

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, उल्हास पवार यांना संगीत रसिकाग्रणी पुरस्कार प्रदान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटर आणि सरस्वती संगीत कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी दिला जाणारा ‘संगीत रसिकाग्रणी’ हा यावर्षीचा पुरस्कार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व ह. भ. प. उल्हास पवार या दोन महानुभावांना ज्येष्ठ संगीतज्ञ गोविंदराव बोरगावकर यांच्या हस्ते व मराठवाडा संगीत कला अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगावकर यांच्या उपस्थितीत प्रदान करुन -हयद्य सत्कार करण्यात भारतीय अभिजात संगीत कलेच्या उत्कर्षासाठी दिलेल्या अनमोल योगदानाबाबत प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व ह.भ. प. उल्हास पवार या दोन्ही महानुभावांनी मराठवाडा व महाराष्ट्रातील संगीत कलावंतांना वेळोवेळी प्रोत्साहन देऊन संगीत कलेचा वारसा जतन करण्यासाठी सक्रिय प्रोत्साहन दिलेले आहे.

यामुळे त्यांना ‘संगीत रसिकाग्रणी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व ह.भ. प. उल्हास पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी संगीत कलावंतांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि संगीत कलेच्या उन्नतीसाठी असेच सहकार्य यापुढेही केले जाईल, असे प्रतिपादन यावेळी केले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक मंगेश बोरगावकर यांनी ‘संतवाणी’ सादर करुन रसिक श्रोत्यांना एकापेक्षा एक सुरस रचना नव्या स्वरुपात सुराविष्कार प्रगट करुन रसिकांना अक्षरश: भक्तीरसात डुंबवून काढले.या भक्तीरंगात सर्वच श्रोत्यांनी भजन गात व विठ्ठल नामाचा गजर करत कलावंतांना उत्स्फूर्त दाद दिली.

नाशिक येथील सुविख्यात गायिका देवश्री नवघरे, लातूरची बालगायिका भक्ती पाटील यांनी यांनी अतिशय तयारीने अभंगवाणी सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या सर्व कलावंतांना तबला संगत तालमणी डॉ. राम बोरगावकर आणि गणेश बोरगावकर यांनी केली तर हार्मोनियम साथ प्रा. लक्ष्मण श्रीमंगले यांनी दिली. प्रास्ताविक डॉ. राम बोरगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदाम पवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार द्वारकादास श्यामकुमारचे संचालक तुकाराम पाटील यांनी मानले. याप्रसंगी संभाजी सुळ, गणपतराव बाजुळगे, समाजकल्याण उपायुक्त देवशटवार, भिकाणे, प्राचार्य बाबुराव जाधव, प्राचार्य निलेश राजेमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या