लातूर : प्रतिनिधी
दयानंद शिक्षण संस्था संचलित येथील दयानंद विधी महाविद्यालय, विधी चिकीत्सालयामार्फत तालुक्यातील मौजे चिखुर्डा येथे दि. ९ फेब्रुवारी एक दिवशीय कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. सकाळच्या पहिल्या सत्रात जनजागृती रॅली, दुपारच्या दुस-या सत्रात विद्यार्थ्यांमार्फत गावातल्या घरोघरी जाऊन सर्व्हे व सायंकाळी तिस-या सत्रात कायद्याची माहिती व पथनाट्य सादरीकरण, असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांमधून जनजागृती करणा-या आली.
सकाळी पहिल्या सत्रात जनजागृती रॅलीची सुरुवात जि. प. प्रा. शाळा चिकुर्डा येथून डॉ. शुभांगी पांचाळ , अॅड. रवींद्र शेट्टी, प्रा. उमेश काटेकर, प्रा. शामराव पाटील, प्रा. चिंते यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून केली. यात हुंडा बळी, स्त्रीशिक्षण, पर्यावरण, मतदार जागृती, संविधान जागृती याविषयावर घोषणा देण्यात आल्या. यावेळी विध्यार्थ्यांच्या हातात अनेक सामाजिक जनजागृती पर फलक होती. दुपारच्या दुस-या सत्रात वैकल्पिक वाद निवारण पद्धती प्रॅक्टिकल अंतर्गत व विधी चिकीत्सालय अंतर्गत गावात विधी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी कायदेविषय सर्व्हे करून गावातील लोकांना कायदेविषयक समस्या जाणून येऊन योग्य ते कायदेशीर माहिती देऊन कायदेविषयक जनजागृती केली.
सायंकाळी तिस-या सत्रात पथनाट्य सादरीकरण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हूणन अॅड. सुरेश सलगरे, पॅनल अॅडवोकेट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर, अॅड. छाया मलवाडे, पॅनल एडवोकेट, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर सरपंच सौ. रत्नाताई कदम, चिखुर्डा येथील कृषी विद्यालयाचे अध्यक्ष सुरेश कदम, ग्रामसेवक ओमप्रकाश भुजबळ, समाजसेवक विश्वासराव कदम, गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक डॉ. शुभांगी पांचाळ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना देताना दयानंद विधी महाविद्यालयाच्या विधी चिकीत्सालया अंतर्गत मनोरंजनातून कायद्याची जनजागृतीसाठी व समाजाभिमुख विद्यार्थी घडवण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पॅनल अॅड. सुरेश सलगरे, यांनी जादूटोणा प्रतिबंध विरोधी कायद्याविषयी माहिती दिली. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कौटुंबिक हिंसाचार, मूल्य संविधानाचे, स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक विषयावर उत्कृष्ट पथनाट्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला गावक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कौटुंबिक हिंसाचार व मूल्य संविधानाचे याविषयी पथनाट्य दयानंद विधी महाविद्यालयाच्या बी. एल. एल. बी. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी यशवंत पाटिल, अनिकेत शितोळे, आनंद रामदासी, बुद्धभूषण जाधव, सय्यद इस्माईल, शिवानी जाधव, प्रणोती सावंत, प्रिया मुळे, अर्पित रणवरे, पूजा ंिरगणकर, ज्ञानदा कुलकर्णी यांनी सादर केले. सूत्रसंचालन अभिषेक सुधीर दोडके व रुक्साना रज्जाक या विद्यार्थ्यांनी आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक अॅड. रवींद्र शेट्टी यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. पूनम नाथानी, समन्वयक डॉ. शुभांगी पांचाळ व प्रा. रवींद्र शेट्टी, कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो: ६