21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरआजादी गौरव पदयात्रा औशात १२ ऑगस्टला

आजादी गौरव पदयात्रा औशात १२ ऑगस्टला

एकमत ऑनलाईन

औसा : अमृत महोत्सवानिमित्ताने राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आजादी गौरव पदयात्रा आयोजीत करण्यात येत असून जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यात १२ ऑगस्ट रोजी आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. औसा विधानसभा क्षेत्रातील ४ गावामधून १५ किलोमीटर ही पदयात्रा जाणार असून या पदयात्रेत काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी संवाद सभा, कॉर्नर बैठका आयोजीत करण्यात आल्या असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी यांनी दिली ..

औसा तालुक्यात येणा-या पदयात्रेच्या नियोजनासाठी विविध समित्याची स्थापना केली जिल्हा काँगेसकडून तयारी करण्यात आली आहे. या पदयात्रेत जिल्ह्यातील विविध संस्था पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी यांनी केले आहे. ही पदयात्रा औसा तालुक्यांतील ंिलंबाळ येथे सकाळी ८.३० वाजता कॉर्नर बैठक, ९.३० वाजता पोमादेवी जवळगा येथे आगमन व सभा,१ वाजता दापेगाव, ३ वाजता नागरसोगा, ४.३० वाजता सभा. ५ वाजता किल्ला मैदान औसा ,६.३० वाजता बसस्टँड औसा येथे समारोप सभा होणार आहे. या पदयात्रेत हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या उपस्थितीत झाली.यावेळी शहराध्यक्ष शकिल शेख, सोशल मीडिया जल्हिा प्रमुख प्रविण सुर्यवंशी, ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.सुधीर पोतदार, रविकांत पाटील,खुनमीर मुल्ला,अंगद कांबळे,मंजुषा हजारे,मुरली सोनटक्के, नामदेव माने,वेताळेश्वर बावगे, मुकेश बिदादा,उदय देशमुख, सचिन गिराम, अमित सोलापुरे, आदम शेख, विश्वास काळे,संजय लोंढे,किरण सोमवंशी,संजय बाबळसुरे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या