21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने जिल्हा काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने जिल्हा काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आखिल भारतीय काँग्रेस कमेटी दिलेल्या सूचनेनुसार आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आजादी गौरव पदयात्रा आयोजीत करण्यात आली असून त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यात जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील २५० गावामधून ७५ किलोमिटर हि पदयात्रा चालत जाणार असून या पदयात्रेत काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी संवाद सभा, कॉर्नर बैठका आयोजीत करण्यात आल्या असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी बोलताना दिली.

७५ व्या अमृत महोत्सवी निमीत्ताने जिल्हा काँगेसच्या वतीने ७५ किलो मिटर पायी चालत पदयात्रा काढली जाणार असून त्यात मागच्या ७५ वर्षात देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे तसेच भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक निर्णय विविध योजना, विकासाचा आराखडा, माहिती तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आदी निर्णयात मोठा वाटा काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे त्याबाबत या सभेतून मान्यवर संभोदित करतील आजादी गौरव पायी पदयात्रा ही ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कार्यकाळात जिल्ह्यांत सर्व तालुक्यातील जवळपास २५० गावातून मार्गक्रमण होईल त्यात लातूर, उदगीर, अहमदपूर, शिरुर अनंतपाळ, देवणी, चाकुर, रेणापूर, निलंगा, जळकोट, रेणापूर तालुक्यात जाणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यात नियोजन करण्यात आले आहे त्या त्या तालुकाध्यक्ष यांच्या नियोजन खाली कॉर्नर बैठका, पदयात्रा जाहिर सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत

९ ते १३ ऑगस्ट पदयात्रेत होणा-या नियोजनासाठी विविध समित्याची स्थापना केली असून प्रत्येक जिल्हा पदाधिकारी यांच्याकडे जवाबदारी देण्यात आल्या आहेत. त्या कार्यक्रमाची जय्यत तयारी जिल्हा काँगेसकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध संस्था पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या आझादी गौरव पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, पदयात्रा समन्वयक प्रवीण पाटील, फ्रंटचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, शिराजोद्दिन जहागीरदार, प्राचार्य एकनाथ पाटील, सुरेश चव्हान, हरिराम कुलकर्णी, शरद देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, प्रा. ओमप्रकाश झुरुळे, रमेश सूर्यवंशी, सूर्यशीलाताई मोरे, विपुल हाके, डॉ. अरविंद भातांब्रे, रवींद्र काळे, यांनी केले आहे.

प्रारंभ अहमदपूर तालुक्यात तर समारोप रेणापूर तालुक्यांत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आझादी गौरव पायी पदयात्रा प्रारंभ ९ ऑगस्ट रोजी अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथून होईल तर समारोप १३ ऑगस्ट रोजी रेणापूर तालुक्यांतील पोहरेगाव येथे होणार असून ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रोकडा सावरगाव, १२ वाजता चाकुर तालुक्यातील हिंपळनेर, २ वाजता नायगाव, ५ वाजता आनंदवाडी, ७ वाजता चापोली येथे. १० ऑगस्ट रोजी सकाळी जळकोट तालुक्यांतील घोणसी ९ वाजता, ११ वाजता गुडसुर, १२.३० हिप्परगा, ३ वाजता डाऊळ, ३ वाजता वाढवणा, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता निलंगा तालुक्यातील शिरोळ, १० वाजता जाहीर सभा, देवणी तालुक्यातील जवळगा येथे १ वाजता सभा, ३ वाजता साकोळ येथे आगमन ६ वाजता जाहिर सभा साकोळ. १२ ऑगस्ट रोजी सकाळी औसा तालुक्यांतील लिंबाळा येथे सकाळी ८.३० वाजता कॉर्नर बैठक, ९.३० वाजता पोमादेवी जवळगा येथे आगमन व सभा, १ वाजता दापेगाव,३ वाजता नागरसोगा, ४.३० वाजता सभा. ५ वाजता किल्ला मैदान औसा, ६.३० वाजता बसस्टँड औसा येथे समारोप सभा. १३ ऑगस्ट रोजी लातूर तालुक्यातील काटगाव येथे सकाळी ८ वाजता कॉर्नर बैठक, ८.३० पदयात्रेला प्रारंभ, टाकळी येथे ९ वाजता आगमन, ९ वाजता जेवळी येथे कॉर्नर बैठक, १० वाजता नाग झरी, रेणापुर तालुक्यांतील इंदरठाणा येथे ११ वाजता बैठक, सांगवी येथे ११.४५ वाजता आगमन, १ वाजता सिंधगाव, २ वाजता पोहेरेगाव येथे आझादी गौरव पायी पदयात्रेचा समारोप होइल.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या